-
ऋजुता लुकतुके
गुरुवारी मुंबईच्या शरद पवार क्रिकेट मैदानावर मुंबई विरुद्ध मेघालय हा रणजी सामना सुरू झाला तेव्हाच मुंबईचं पारडं जड आहे सगळ्यांनाच ठाऊक होतं. पण, मुंबईला बाद फेरी गाठायची असेल तर हा सामना बोनस गुणासह जिंकावा लागेल. आणि मग बडोदे आणि जम्मू व काश्मीर यांच्यातील निकालाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे मुंबईच्या संघाने हा सामना गांभीर्यानेच घेतलेला कळत होतं. कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकून मेघालयला पहिली फलंदाजी दिली. (0Mum vs Megh, Ranji Trophy
आणि त्यानंतर पहिल्या ३ षटकांमध्ये शार्दूलचा जलवा लोकांना पाहायला मिळाला. आधी त्याने पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर निशांत चक्रवर्तीला बाद केलं. मुलानीकडे झेल देऊन निशांत बाद झाला. त्यानंतर शार्दूल आपलं दुसरं षटक टाकण्यासाठी आला. मेघालयची धावसंख्या तेव्हा १ धाव अशीच होती. उलट किशन लिंगडोह हा आणखी एक फलंदाज शून्यावर बाद झाला होता. इतक्यात तिसरं षटक शार्दूलने टाकायला घेतलं. (Mum vs Megh, Ranji Trophy)
षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर शार्दूलने लागोपाठ तीन फलंदाजांना बाद केलं. बालचंदर अनिरुद्ध आणि जसकिरत सचदेवा हे तर त्रिफळाचित झाले. मेघालयाची अवस्था झाली ५ बळींवर २ धावा. आणि शार्दूल ठाकूर या हंगामातील हॅट – ट्रीक घेणारा फक्त दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी पहिल्या टप्प्यात रिषी धवनने हॅट ट्रीक घेतली आहे. (Mum vs Megh, Ranji Trophy)
Balchander Anirudh ✅
Sumit Kumar ✅
Jaskirat Singh Sachdeva ✅Shardul Thakur is on fire 🔥
He’s picked up a 𝗵𝗮𝘁-𝘁𝗿𝗶𝗰𝗸 to help Mumbai bowl out Meghalaya for 86 👌👌#RanjiTrophy | @imShard | @MumbaiCricAssoc | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/9ApJe0CgxG pic.twitter.com/B9azjgx1JB
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 30, 2025
मेघालयाची अशी दाणादाण उडाली की, पहिल्या ६ पैकी ५ फलंदाज शून्यावर बाद झाले. शेवटच्या ४ फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठल्यामुळे त्यांनी निदान ८६ धावांपर्यंत मजल मारली. शार्दूलने ४, मोहित अवस्थीने ३, सिल्व्हेस्टर डिसुझाने २ तर शम्स मुलानीने १ बळी मिळवला. (Mum vs Megh, Ranji Trophy)
(हेही वाचा- Metro Construction Collapse : चेंबूरमध्ये मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले; रहिवासी परिसरात मोठी वाहतूक कोंडी)
मुंबईकडून रणजी स्पर्धेत हॅट ट्रीक करणारा शार्दूल ठाकूर हा पाचवा गोलंदाज आहे. नजीकच्या काळात २०२३-२४ च्या हंगामात मुंबईकडून रेस्टन डायसकडून बिहार विरुद्ध हॅट ट्रीक घेतली होती. तर यापूर्वी अब्दुल इस्माईल, उमेश कुलकर्णी आणि जहांगीर खोत यांनी मुंबईकडून हा मान मिळवला आहे. (Mum vs Megh, Ranji Trophy)
मेघालय विरुद्ध मुंबईने पहिल्या दिवसअखेर १२७ धावांची आघाडी घेतली होती. मेघालयला ८६ धावांत गुंडाळल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सिद्धेश लाड यांच्या अर्धशतकांमुळे मुंबईने पहिल्या डावावर पकड मिळवली आहे. (Mum vs Megh, Ranji Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community