अमेरिकन एअरलाइन्सचे (American Airlines) जेट विमान रेगन विमानतळावर (Reagan Airport) उतरत असताना त्याची लष्करी हेलिकॉप्टरशी धडक झाली. या विमानात ६० प्रवासी, चार कर्मचारी असे ६४ लोक, तर हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. ते सर्व जण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोटोमॅक नदीकिनारी, तसेच नदीपात्रात घेतलेल्या शोधानंतर २८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. (Washington DC Plane Crash)
(हेही वाचा – Mum vs Megh, Ranji Trophy : शार्दूल ठाकूरची हॅट – ट्रीक, पहिल्या दिवसअखेर मुंबईकडे १२७ धावांची आघाडी)
बुधवार, २९ जानेवारीच्या रात्री जेट विमान आणि लष्करी हेलिकॉप्टर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला. एकाच रनवेवर जेट विमान, हेलिकॉप्टर उतरत होते. कोसळलेले हेलिकॉप्टर व विमानाचा नदीपात्रातही शोध सुरू आहे.
अपघातग्रस्त विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष पोटोमॅक नदीच्या तळाशी आढळून आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या भीषण दुर्घटनेनंतर रेगन विमानतळावरून होणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
यापूर्वीही झाली होती दुर्घटना
१३ जानेवारी १९८२ रोजी खराब हवामानामुळे एअर फ्लोरिडाचे विमान पोटोमॅक नदीत (Potomac River) कोसळले. त्यात ७८ लोक ठार झाले होते. २००९ मध्ये न्यूयॉर्कमधील बफेलो शहराजवळ विमान अपघातात ४६ प्रवासी आणि ४ कर्मचारी मरण पावले होते. (Washington DC Plane Crash)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community