-
ऋजुता लुकतुके
नुकतीच ऑस्ट्रेलियाचा कसलेला फलंदाज स्टिव्ह स्मिथने श्रीलंकेविरुद्घ गॉल कसोटीत आपलं ३६ वं शतक झळकावलं. आधी भारताविरुद्धच्या मालिकेत तो सुरुवातीला चाचपडत होता. आणि वर्षभर तो फॉर्मशी झुंजत होता. पण, शेवटच्या मेलबर्न आणि सिडनी कसोटीत त्याला सूर गवसला. आणि त्याने लागोपाठ दोन शतकं ठोकली. त्यानंतर आता गॉलमध्ये त्याने रुबाबात १०,००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. (Virat Kohli)
(हेही वाचा- Mum vs Megh, Ranji Trophy : शार्दूल ठाकूरची हॅट – ट्रीक, पहिल्या दिवसअखेर मुंबईकडे १२७ धावांची आघाडी)
कसोटी क्रिकेटमध्ये स्टिव्ह स्मिथने फॉर्म परत मिळवल्यावर आणि जो रुट तसंच न्यूझीलंडचा केविन विल्यमसन हे मागची तीन वर्षं सातत्याने गाजत असताना एकेकाळी शतकांचा रतीब घालणाऱ्या विराट कोहलीची बॅट मात्र २०१८ पासून अचानक शांत झाली आहे. कसोटीत मागच्या ६ वर्षांत त्याची सरासरीही घसरली आहे. २०१८ पर्यंत कसोटी क्रिकेटमधील ‘फॅब फोर’ असं या चौघांचं वर्णन केलं जायचं. पण, आता या फॅब फोरमधून विराटचं नाव गळालं आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. (Virat Kohli)
माजी भारतीय कसोटीपटू आकाश चोप्रालाही हा प्रश्न पडला आहे. ‘विराटची बॅट तर शांत आहेच. पण, त्याची फलंदाजीतील सरासरी चिंता वाढवणारी आहे. स्टिव्ह स्मिथने ३६ वं शतक झळकावलं ते २०५ व्या डावांत त्याची सरासरी ५३ धावांची आहे. तर जो रुटनेही ३६ शतकं ठोकली आहेत. आणि तो तसंच विल्यमसनची सरासरी ५० च्या वरच आहे. विराट कोहली मात्र गेल्या सहा वर्षांतील खराब कामगिरीमुळे ४८ च्या सरासरीवर रखडला आहे. आणि हे सर्वोत्तम फलंदाजाचं लक्षण नाही. फॅब फोरमध्ये कायम राहायचं असेल तर विराटला कामगिरी उंचवावी लागेल,’ असं चोप्राने आपल्या युट्यूब चॅनलवर बोलून दाखवलं आहे. (Virat Kohli)
(हेही वाचा- Mumbai-Pune Expressway वरील अपघात किती टक्क्यांनी वाढले ? पोलिसांनी सांगितली आकडेवारी)
२०१४ चं वर्षं विराट कोहलीसाठी कसोटींत सगळ्यात वाईट वर्षं ठरलं आहे. १० कसोटींत त्याने २४ धावांच्या सरासरीने फक्त ४१७ धावा केल्या आहेत. यात त्याला एकच शतक आणि १ अर्धशतक करता आलं आहे. विराटच्या खराब फॉर्मची सुरुवात २०२० सालापासून झाली आहे. आणि या चार वर्षांत त्याने ३९ कसोटींमध्ये २,०२८ धावा जमवल्या आहेत. त्याची सरासरीही ३० धावांची आहे. कसोटीत आतापर्यंत त्याने ३० शतकं केली आहेत. पण, त्यातील २८ २०१८ पर्यंतची आहेत. त्यानंतरच्या काळात त्याला फक्त ३ शतकं करता आली आहेत. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community