Bangladeshi infiltrators : स्वतःच्या मुलुखात जाण्यासाठी बांगलादेशींकडून खोट्या दस्तावेजाचा वापर

65
Bangladeshi infiltrators : स्वतःच्या मुलुखात जाण्यासाठी बांगलादेशीकडून खोट्या दस्तावेजाचा वापर
Bangladeshi infiltrators : स्वतःच्या मुलुखात जाण्यासाठी बांगलादेशीकडून खोट्या दस्तावेजाचा वापर
स्वतःच्या देशात जाण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांनी भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतात घुसखोरी करून येथील बोगस कागदपत्रे मिळणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी बांगलादेशचा व्हिसा मिळवला आणि स्वतःच्या देशात पर्यटक म्हणून नातेवाइकांना भेटून आल्याचा प्रकार समोर आला आहे. घाटकोपर पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या चौकशीत हे उघड झाले. मागील २५-३० वर्षांपासून मुंबईत घुसखोरी करून रहाणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांनी अनेक सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. (Bangladeshi infiltrators)
पूर्व उपनगरातील परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस पथकाचे गठन केले आहे. या पथकाचे प्रमुख घाटकोपर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रवी ठेंगळे हे आहेत, या पथकाने बुधवारी वर्सोवा आणि जुहू गल्ली येथून लहान मुलांसह १२ बांगलादेशी घुसखोर नागरिकांना ताब्यात घेऊन त्यापैकी ३ पुरुष, ५ महिलांना अटक करण्यात आली होती. दरम्यान विशेष पथकाला या बांगलादेशी नागरिकाच्या घर झडतीत पोलिसांना भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड, पॅन कार्ड, शिधावाटप पत्रिका आणि बांगलादेशाचे ६ व्हिसा मिळून आले होते. (Bangladeshi infiltrators)
व्हिसासंदर्भात बांगलादेशी नागरिकांकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे, या बांगलादेशी नागरिकांनी भारतीय असल्याचे बनावट कागदपत्रे बांगलादेश दूतावासात सादर करून त्यांनी व्हिसा मिळवला आणि अनेक वेळा बांगलादेशात रहाणाऱ्या आपल्या नातलगांना भेट दिल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर या घुसखोर बांगलादेशी नागरिकांकडे शिधावाटप पत्रिका मिळून आल्याने या घुसखोरांनी अनेक सरकारी योजनांचा लाभ घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घुसखोर बांगलादेशींची दुसरी पिढी भारतात जन्माला आली आहे. (Bangladeshi infiltrators)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.