गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. जीबीएस (GBS) रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) जीबीएसने रुग्ण दगावला असल्याची माहिती समोर आली आहे. 36 वर्षीय हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता. 21 जानेवारीला तो महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. मात्र, उपचारासाठी आला तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर होता. (Guillain Barre Syndrome)
हेही वाचा-Raigad चे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे, मुंबई भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता नाही
गेली आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. मात्र, काल (30 जाने.) त्याने अखेरचा श्वास घेतला. पुणे शहर परिसरात आत्तापर्यंत जीबीएसचे 130 रुग्ण आढळलेत. तर महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जीबीएसमुळे हा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. (Guillain Barre Syndrome)
वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणेंनी ही माहिती दिली आहे. पिंपळे गुरव भागातील हा तरुण ओला-उबेरचा चालक असून तो 21 जानेवारीला वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. उपचारांसाठी दाखल झाला तेव्हापासून त्याची तब्येत खालावलेली होती, त्यामुळं पहिल्याच दिवशी त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं होतं. तो ओला-उबेर चालक असल्यानं त्याने कोणत्या परिसरातील पाणी प्यायल्याने त्याला जीबीएसची लागण झाली, याचा शोध लागेना. (Guillain Barre Syndrome)
हेही वाचा-Mumbai-Pune Expressway वरील अपघात किती टक्क्यांनी वाढले ? पोलिसांनी सांगितली आकडेवारी
ताप, सर्दी आणि अशक्तपणा आल्याने उपचारांसाठी रूग्ण दाखल झाला. तो दाखल झाल्यानंतर चार ते पाच तासांमध्ये त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं होतं. त्याच्यावर योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. एक्सरे केल्यानंतर लक्षात आलं रूग्णाच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये निमोनिया झाला आहे. त्या दृष्टीने उपचार करत असताना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. (Guillain Barre Syndrome)
काय काळजी घ्याल ? (Guillain Barre Syndrome)
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community