SEBI Chief Retires : अर्थ मंत्रालयाने मागविले नवीन सेबी प्रमुख यांच्या नियुक्तीसाठी अर्ज

SEBI Chief Retires : सेबीच्या सध्याच्या अध्यक्ष माधबी पुरी-बुच फेब्रुवारीत पायउतार होणार आहेत.

45
SEBI Chief Retires : अर्थ मंत्रालयाने मागविले नवीन सेबी प्रमुख यांच्या नियुक्तीसाठी अर्ज
  • ऋजुता लुकतुके

सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात, सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी-बुच यांचा कार्यकाल २८ फेब्रुवारीला संपणार आहे. त्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. आता त्यांच्याजागी नवीन नियुक्तीची प्रक्रिया अर्थ मंत्रालयाने सुरू केली आहे. माधबी बुच यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा होता. अजय त्यागी यांच्या जागी २०१७ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. माधबी पुरी-बुच या आपल्या करड्या स्वभावासाठी ओळखल्या जात. पण, कारकीर्दीच्या उत्तरार्धात काही वादांमुळेही त्या चर्चेत राहिल्या. (SEBI Chief Retires)

पुढील सेबी प्रमुखाचा कार्यकाळ कमाल ५ वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत असते. यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या सचिवाएवढे वेतन आणि इतर सुविधा मिळतात किंवा गाडी आणि घराशिवाय दरमहा ५,६२,५०० रुपये इतका पगार मिळतो. बुच यांनी १९८९ मध्ये आयसीआयसीआय बँकेतून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. २००७ ते २००९ पर्यंत या बँकेत त्या कार्यकारी संचालक होत्या. त्यानंतर पुढील दोन वर्षं त्या आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होत्या. २०११ मध्ये त्या सिंगापूरला गेल्या आणि ग्रेटर पॅसिफिक कॅपिटलमध्ये काम केले. (SEBI Chief Retires)

(हेही वाचा – MMRDA साठी एकच परिवहन सेवा करण्याचा अभ्यास सुरु; वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती देणार अहवाल)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमधून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. त्यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. माधवी यांना आर्थिक क्षेत्रातील ३० वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी यापूर्वी सेबीच्या विविध समित्यांवर काम केले आहे. त्या त्याच्या सल्लागार समितीवरही होत्या. गेल्यावर्षी हिंडेनबर्ग समुहाने सादर केलेल्या एका अहवालानंतर त्या वादात सापडल्या. (SEBI Chief Retires)

अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने १९ ऑगस्ट २०२४ च्या रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी-बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचा अदानी समूहाशी निगडीत ऑफशोअर कंपनीत हिस्सा असल्याचा दावा करण्यात आला होता. हिंडेनबर्गने दावा केला की बुच आणि त्यांच्या पतीचे मॉरिशस ऑफशोअर कंपनी ‘ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंड’ मध्ये स्टेक आहेत. (SEBI Chief Retires)

(हेही वाचा – Raigad चे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे, मुंबई भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता नाही)

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांनी ‘ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज फंड’मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा आरोप हिंडेनबर्ग यांनी केला होता. हा पैसा अदानी समूहाच्या शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी वापरण्यात आला. सेबी प्रमुख असताना तीन ठिकाणांहून पगार घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. काँग्रेस पक्षानेही सेबी प्रमुखांवर आरोप केले होते. सेबीशी संलग्न असताना त्यांनी आयसीआयसीआय बँकेसह तीन ठिकाणांहून पगार घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र माधबी आणि आयसीआयसीआय अशा दोघांनीही हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. (SEBI Chief Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.