आसिफच्या वासनेची शिकार ठरली अल्पवयीन Hindu मुलगी; धर्मांतराला नकार दिल्याने साथीदारांसह मिळून केली हत्या

90
आसिफच्या वासनेची शिकार ठरली अल्पवयीन Hindu मुलगी; धर्मांतराला नकार दिल्याने साथीदारांसह मिळून केली हत्या
आसिफच्या वासनेची शिकार ठरली अल्पवयीन Hindu मुलगी; धर्मांतराला नकार दिल्याने साथीदारांसह मिळून केली हत्या

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी येथे एका अल्पवयीन हिंदू (Hindu) मुलीला एका मुस्लिम तरुणाने आमिष दाखवून पळवून नेले. यानंतर पीडितेवर मुस्लिम तरुणाने बलात्कार केला. तसेच पीडितेवर मुस्लिम तरुणाने इस्लाम धर्म स्वीकारण्यास दबाव आणला होता. जेव्हा अल्पवयीन पीडित मुलीने नकार दिला तेव्हा मुस्लिम तरुणाने मित्रांच्या मदतीने पीडितेची हत्या केली. पीडितेचा मृतदेह लखीमपूरपासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर जंगलात फेकला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एका आरोपीचे एन्काऊंटरही करण्यात आले आहे.

( हेही वाचा : agniveer salary : अनेक तरुणांना व्हायचे आहे अग्निवीर… पण तुम्हाला माहितीय अग्निवीरला किती पगार मिळतो?

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील पडुआ पोलिस स्टेशन परिसरातील गोरिया गावात राहणारी १७ वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलगी २५ जानेवारी २०२५ रोजी बेपत्ता झाली. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिचा आजूबाजूला शोध घेतला पण ती सापडली नाही. यानंतर पीडितेच्या कुटुंबाने पडुआ पोलिस स्टेशन गाठले आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, एका तरुणाने अल्पवयीन मुलीला फसवून तिला पळवून नेले. त्यांनी आरोपीच्या सहकाऱ्यांची नावे सांगत ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. (Uttar Pradesh)

मुस्लिम तरुणाने हिंदू (Hindu) तरुणीला फसवल्याने हिंदू संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा असे आढळून आले की, आसिफ (Asif) नावाचा एक तरुण हिंदू अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन गेला होता. पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले. यानंतर पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. असिफ लखीमपूरहून डेहराडूनला गेल्याचे समोर आले. या आधारावर पोलिसांचे पथक डेहराडूनला (Dehradun) पोहोचले आणि आरोपीच्या साथीदारांना अटक केली. त्याची चौकशी केली असता, हिंदू अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांना कळली.

आरोपीच्या साथीदारांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह रामनगरच्या जंगलात फेकून देण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे शवविच्छेदन केले. यानंतर, मुख्य आरोपी आसिफला लखीमपूर येथूनच एन्काउंटरनंतर पकडण्यात आले. (Asif) मृत मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की आसिफ (Asif) आणि त्याचे मित्र अल्पवयीन मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होते आणि जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात, आसिफ व्यतिरिक्त, पोलिसांनी सलमान (Salman) , रजब आणि झुबैरसह ६ जणांना अटक केली आहे. या मुद्द्यावर हिंदू संघटनांनी निदर्शने केली आहेत. पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत. (Asif)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.