Railway TC Body Camera: विनातिकीट प्रवाशांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; तिकीट तपासकांना मिळणार बॉडी कॅमेरा 

86
मुंबईकरांची लाईफलाइन (Mumbaikar Lifeline) असलेल्या लोकल रेल्वे संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासनिसांना (टीसी) ड्युटीवर असताना बॉडी कॅमेरे (Body camera) देण्यात येणार आहेत. त्यामुळे तिकीट तपासणी सुरू असताना काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे रेकॉर्डिंग करणे शक्य होईल. तसेच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी या बॉडी कॅमेरामधील रेकॉर्डिंगचा उपयोग होईल. (Railway TC Body Camera)

टीसींच्या बॉडी कॅमेराचा कसा होणार उपयोग ?
विनातिकीट प्रवास (Travel without ticket) करणाऱ्या व्यक्तींना पकडल्यावर ते अनेकदा दंड भरण्यासाठी टाळाटाळ करतात. दंडावरुन त्यांचे टीसीसोबत वाद होतात. काही वेळा हे प्रकरण मारहाणीपर्यंतही जातं. त्यामुळे अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून टीसींसाठी (TC) बॉडी कॅमेरा उपलब्ध करण्यात येणार आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाने वाद घातल्यास रेल्वे कायदा 1989 च्या कलम 140 नुसार रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुढील कारवाईसाठी वापरता येईल.

प्री-कस्टडी एरिया 

विनातिकीट प्रवास करताना पकडल्यानंतर, प्रवाशाने दंड भरण्यास नकार दिल्यास त्याला प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या प्री-कस्टडी एरियामध्ये (Pre-custody area) ठेवण्यात येईल. तेथे त्याला नियम समजावून सांगितले जातील. जर प्रवासी दंड भरण्यास नकार देत असेल तर एक मेमो जारी करून त्याला आरपीएफकडे (RPF) सुपूर्द केले जाईल. सध्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांवर प्री-कस्टडी एरिया तयार करण्यात येत आहे. कालांतराने सर्व स्थानकांवर तशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तिकीट तपासणीत पारदर्शकता येण्यासाठी बॉडी कॅमेरे देण्यात येत आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर वचक ठेवण्यास मदत होईल. असे विधान पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी केले.

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील तायक्वांदो प्रशिक्षक Rajesh Khillare यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्रिकुटाला २४ तासांत अटक)

३२.१६ लाखांचा दंड वसूल
कॅमेऱ्याच्या चाचणीसाठी २३ जानेवारीपासून विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी काही टीसींना बॉडी कॅमेरे दिले होते. विनातिकीट प्रवास करणाऱ्या सात हजारांहून अधिक प्रवाशांकडून ३२.१६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाई अशी…
७३६२ प्रकरणे
११०० पश्चिम रेल्वेवर टीसी
४०० मुंबई उपनगरातील टीसी

(हेही वाचा – Dhananjay Munde यांची मंत्रीपद वाचवण्याची धडपड?)

या देशात वापरला पहिल्यांदा ‘बॉडी कॅमेरा’

बॉडी कॅमेरे पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये 2005 मध्ये पोलिसांनी परिधान केले होते आणि त्यानंतर जगभरातील असंख्य पोलीस दल आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी ते स्वीकारले आहेत. भारतातील अनेक पोलीस दल देखील बॉडी कॅमेरे वापरतात.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.