- प्रतिनिधी
डीएन नगर ते मंडाळे मेट्रो २ब प्रकल्पाच्या स्थापत्य खर्चात तब्बल २४८ कोटी रुपयांची वाढ झाली असून, एकूण खर्च आता ३,३०४.८३ कोटी झाला आहे. कामाच्या दिरंगाईमुळे कंत्राटदारांना १.९२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवली आहे. (Metro 2B Project)
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्याशिवाय आपण मराठीचा विचार करू शकत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार)
काम विलंबाने, खर्चात वाढ
हा प्रकल्प चार टप्प्यात विभागलेला असून, विविध पॅकेजअंतर्गत दिलेल्या कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर विलंब झाला आहे.
- डीएन नगर ते बीकेसी एमटीएनएल (पॅकेज C१०१)-१३०७.८८ कोटींचा खर्च होता, ५५.५४ कोटींची वाढ. दंड-१.३६ लाख रुपये
- बीकेसी एमटीएनएल ते चेंबूर डायमंड गार्डन (पॅकेज C१०२)-७५९.६७ कोटींचा खर्च, दंड-१४.९९ लाख रुपये
- चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाळे (पॅकेज CA७)-४५८.९३ कोटींचा खर्च, १२२.७७ कोटींची वाढ. दंड-२९.५८ लाख रुपये
- मंडाळे कारशेड (पॅकेज CA१४)-५३०.३२ कोटी खर्च, ६९.६८ कोटींची वाढ. दंड-१०.९७ लाख रुपये (Metro 2B Project)
(हेही वाचा – आसिफच्या वासनेची शिकार ठरली अल्पवयीन Hindu मुलगी; धर्मांतराला नकार दिल्याने साथीदारांसह मिळून केली हत्या)
काम विलंबामुळे प्रवाशांचे नुकसान
सुरुवातीला हे प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण होणार होते, मात्र आता २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अनिल गलगली यांनी योजना अकार्यक्षम नियोजनामुळे अडकत असल्याची टीका केली असून, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. (Metro 2B Project)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community