- ऋजुता लुकतुके
१ फेब्रुवारीपासून तुमचा यूपीआय व्यवहार होऊ शकला नाही तर गोंधळून जाऊ नका, तुम्ही वापरत असलेल्या यूपीआय ॲपवर तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी तपासून पाहा. कारण, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा आयडी फक्त ‘अल्फान्युमरिक’ म्हणजेच इंग्लिश मूळाक्षरं आणि आकड्यांनी बनवलेला असावा असे निर्देश दिले आहेत. तुमच्या आयडीमध्ये जर ‘@, *, $, #,’ अशी स्पेशल कॅरेक्टर अशतील तर तुमचा व्यवहार पूर्ण होऊ शकणार नाही. (UPI Payments)
तुम्ही वापरत असलेलं यूपीआय ॲप हे आयडी तयार करत असतं आणि एनपीसीएनं याआधीच पत्रक काढून या ॲपना ट्रान्झॅक्शन आयडीविषयी सूचना दिल्या आहेत. पण, त्यांनी पालन न केल्यास आता एनपीसीआयने व्यवहारच होऊ न देण्याचा मार्ग अवलंबला आहे. (UPI Payments)
(हेही वाचा – Ahilya Devi Nagar मध्ये उबाठा शिवसेनेला खिंडार; महापौरांसह १२ नगरसेवक शिवसेनेत)
यापूर्वी एकाच ट्रान्झॅक्शन आयडीवर अनेक खात्यांची नोंदणी होण्याचे प्रकारही उघड झाले होते. त्यांच्यावरही एनपीसीआयने कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे असे आयडीही अलीकडच्या काळात रद्द झाले आहेत. त्याचा फटका अनेक ग्राहकांना बसला आहे. पण, त्यावर एनपीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे आणि यूपीआय ॲपना तशी तंबीही दिली आहे. (UPI Payments)
एनपीसीआयला ट्रान्झॅक्शन आयडी निर्मितीची प्रक्रिया सुटसुटीत करायची आहे आणि हे बदललेले दोन्ही नियम हे खासकरून उद्योजकांसाठी आहेत. म्हणजे ज्यांना आपण पैसे देतो त्यांच्यासाठी आहेत. एकापेक्षा जास्त आयडी निर्माण करणे, आयडीमध्ये कुठलंही स्पेशल कॅरेक्टर वापरणे असले प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. दुकानदार, व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. पण, सध्या याचा फटका सर्वसामान्याही बसताना दिसत आहे. (UPI Payments)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community