मालेगाव (Malegaon) बांगलादेशी रोहिंग्या जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळा (Birth Certificate Scam) प्रकरणी शासनाने एसआयटी (SIT) समिती स्थापन केली. त्यामुळे मालेगावला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप राजकीय पक्ष संघटनानी केला आहे. यामध्ये मालेगाव मध्यमधील काँग्रेस, उबाठा आणि एमआयएम पक्षातील आमदार आणि खासदार एकवटले असून सोमय्या यांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, “मालेगावचे काँग्रेस, शिवसेना उबाठा, आणि एमआयएमचे आमदार, खासदार मला आता धमक्या देत आहेत. बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या (Bangladeshi and Rohingya infiltrators) विरोधात आंदोलन केल्यास आम्ही आम्ही किरीट सोमय्यांना जाब देणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.” मालेगावमध्ये ३ हजार ९७७ बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला असून खोटे कागदपत्र दिले. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई झालीच पाहिजे असे सांगत या सर्वांना बांग्लादेशला परत पाठवणार असल्याचे किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले.
मालेगांवचे काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, AIMIM आमदार, खासदार हे मला आता धमक्या देत आहेत..
“आम्ही किरीट सोमैयांना जाब देणार”
मी उद्या मालेगांवला भेट देणार
3977 बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला खोटे कागदपत्र दिले, यांचा विरोधात कारवाई होणार, या सर्वांना बांगलादेशला परत पाठवणार pic.twitter.com/e5zrOmlESH
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 30, 2025
(हेही वाचा – Railway TC Body Camera: विनातिकीट प्रवाशांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; तिकीट तपासकांना मिळणार बॉडी कॅमेरा )
शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी किरीट सोमय्या मालेगाव पोलिस स्टेशनला भेट देणार आहेत. “महाराष्ट्रात ५४ शहरांत १ हजारहून अधिक बांग्लादेशी रोहिंग्या घुसखोरांनी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र (Bangladeshi fake birth certificate) मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातल्याने हा घोटाळा उघडकीस आला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी मालेगावला जाणार आहे,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या मालेगाव दौऱ्याला मुस्लिम संघटनांकडून विरोध करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community