Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पाची काही ठळक वैशिष्ट्ये

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. 

75
Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पाची काही ठळक वैशिष्ट्ये
  • ऋजुता लुकतुके

संसदेचं विशेष अधिवेशन सत्र सुरू झालं आहे आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी १ फेब्रुवारीला आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. सीतारमण यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. तसंच देशाचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या फक्त दुसऱ्या महिला आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी १९७० मध्ये अर्थसंकल्प मांडला होता. यंदाच्या अर्थसंकल्पाची अशीच काही वैशिष्ट्य जाणून घेऊया. (Union Budget 2025)

(हेही वाचा – Railway TC Body Camera: विनातिकीट प्रवाशांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; तिकीट तपासकांना मिळणार बॉडी कॅमेरा )

अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान इंदिरा गांधी यांच्याकडे आहे. १९६९ हे वर्ष भारतीय राजकारणासाठी महत्त्वाचं होतं. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यावेळी अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई कार्यरत होते. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे मोरारजी देसाई यांना पक्षाबाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळं वित्तमंत्री हे पद रिक्त होतं. तीन महिन्यानंतर सादर होणारा अर्थसंकल्प हे इंदिरा गांधी यांच्या सरकारसमोर आव्हान होतं. मोरारजी देसाई यांच्याकडील अर्थमंत्रिपद अतिरिक्त कार्यभार म्हणून पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी स्वत:कडे घेतलं होतं. इंदिरा गांधी यांनी २८ फेब्रुवारी १९७० रोजी अर्थसंकल्प सादर करत इतिहास रचला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या. (Union Budget 2025)

(हेही वाचा – Ahilya Devi Nagar मध्ये उबाठा शिवसेनेला खिंडार; महापौरांसह १२ नगरसेवक शिवसेनेत)

इंदिरा गांधी यांच्यानंतर कोणत्या महिला नेत्याला अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली असेल तर ती निर्मला सीतारमण यांना. निर्मला सीतारमण यांनी पहिल्यांदा २०१९ मध्ये अर्थसंकल्प सादर केला. आणि तेव्हापासून त्याच निर्मला सीतारमणच अर्थसंकल्प मांडत आल्या आहेत. ६ पूर्ण आणि २ लेखानुदान असे एकूण ८ अर्थसंकल्प सीतारमण यांनी आतापर्यंत सादर केले आहेत. १ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. त्या बैठकीत अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली जाईल. यानंतर निर्मला सीतारामन या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटतील. राष्ट्रपती अर्थसंकल्प मांडण्यास मंजुरी देतील. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील. (Union Budget 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.