नवी दिल्ली येथील प्रसिद्ध उद्योगपती अभिषेक वर्मा (Abhishek Varma) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मुक्तागिरी बंगल्यावर जाऊन भेट घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगाही सोबत होते.
( हेही वाचा : Union Budget 2025 : रेल्वे अर्थसंकल्पातून हाय-स्पीड रेल्वे, वंदे भारत निर्मितीची अपेक्षा; रेल्वे अर्थसंकल्पातून काय अपेक्षा?)
यावेळी शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांची नियुक्ती पक्षाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक (निवडणूक आणि युती) या पदी केली. तसे नियुक्तीपत्र शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ (Captain Abhijit Adsul), शिवसेनेचे आसाम (Shiv Sena Assam) राज्यप्रमुख आणि नॉर्थ ईस्ट प्रभारी परमिंदरसिंह मनचंदा (Parminder Singh Manchanda) हेदेखील उपस्थित होते.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community