Union Budget 2025 : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार, वायदे बाजार, कमोडिटी बाजार सुरू राहणार की बंद?

Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

51
Union Budget 2025 : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार, वायदे बाजार, कमोडिटी बाजार सुरू राहणार की बंद?
  • ऋजुता लुकतुके

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. यंदा हा दिवस शनिवारी येत आहे. संसदेचं विशेष सत्र शुक्रवारी ३१ जानेवारीपासून सुरू झालं आहे. शनिवार असल्यामुळे शेअर बाजार, कमोडिटी बाजार तसंच वायदे बाजार या दिवशी सुरू असतील की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. (Union Budget 2025)

मल्टी कमोडिटी एक्सचेंज जे देशातील सगळ्यात मोठं कमोडिटी एक्सचेंज आहे, शनिवारी १ फेब्रुवारी रोजी खुलं राहणार आहे. अर्थ संकल्प सादर होत असतानाच इथले व्यवहारही सुरू असतील. शनिवारी अर्थसंकल्पानिमित्तानं विशेष ट्रेडिंग सत्र चालवलं जाणार आहे. हे सत्र चालवलं जाण्यामागील प्रमुख कारण म्हणजे अर्थसंकल्प सादर होतो त्या दिवशी जे तेजी आणि घसरणीचं वातावरण असतं त्याचा लाभ शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसह कमोडिटी बाजारातील गुंतवणूकदारांकडून देखील घेतला जावा. त्या दिवशी एमसीक्सवर ट्रेडिंग सुरु ठेवल्यानं गुंतवणूकदारांचं नुकसान देखील कमी होईल. एमसीक्सवर ट्रेडिंग सत्र सकाळी ९ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहील. (Union Budget 2025)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : मनीष सिसोदियांमुळे जंगपुरा मतदारसंघाकडे दिल्लीकरांचे लक्ष)

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार तसंच कमोडिटी बाजार बंद असतील तर नंतरच्या व्यवहाराच्या दिवशी मोठे उतार चढाव बघायला मिळू शकतात. हा धोका टाळण्यासाठी अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय सर्व एक्सचेंजनी घेतला आहे. (Union Budget 2025)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडून २९ जानेवारीला जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. शनिवारी १ फेब्रुवारीच्या दिवशी विशेष ट्रेडिंग सेशन चालवलं जाणार आहे. कारण, बाजारातील भागीदारांना अर्थसंकल्पांमुळे निर्माण होणारी जोखीम प्रत्यक्ष कालावधीत सांभाळता यावी याकरिता हा निर्णय घेतल्याचं एक्सचेंडनी कळवलं आहे. याशिवाय हेजिंग ही या दिवशी शक्य असेल. १ फेब्रुवारीचा दिवस सेटलमेंट हॉलिडेप्रमाणं असेल यामध्ये पे-इन किंवा पे आऊट होणार नाही. म्हणजे तुम्ही केलेल्या व्यवहाराचे पैसे त्यादिवशी तुमच्या खात्यातून वळते होणार नाहीत. (Union Budget 2025)

(हेही वाचा – Railway TC Body Camera: विनातिकीट प्रवाशांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; तिकीट तपासकांना मिळणार बॉडी कॅमेरा )

एमसीक्सनं परिपत्रकात म्हटलं की ३१ जानेवारी २०२५ ला संपणाऱ्या वायद्यात बदल होणार नाहीत. पण, १ फेब्रुवारीला पार पडलेले सौदे सोमवारी ३ फेब्रुवारीला प्रत्यक्ष खात्यात दिसतील. शनिवारी १ फेब्रुवारीला भारतीय शेअर बाजार देखील सुरु राहणार आहे. एनएसई आणि बीएसईवर सामान्य कारभार सुरु राहील. इतर दिवसांप्रमाणेच ९ वाजून १५ मिनिटांनी सत्र सुरू होईल आणि ते साडे तीन वाजेपर्यंत चालेल. (Union Budget 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.