लोकसभेत Economic Survey 2025 सादर; जीडीपी वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज

38
लोकसभेत Economic Survey 2025 सादर; जीडीपी वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज
लोकसभेत Economic Survey 2025 सादर; जीडीपी वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज

देशाचा आगामी अर्थसंकल्प दि. १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सरकारच्या कामकाजासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात. यावेळच्या अर्थसंकल्पात करदात्यांपासून शेतकरी, महिला आणि तरुणांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पात गिफ्ट मिळू शकतं. (Economic Survey 2025)

( हेही वाचा : Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पाची काही ठळक वैशिष्ट्ये)

यंदा सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी जीडीपी वाढीचा दर हा ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२४-२५ सादर केला. या सर्वेक्षणात, FY२६ साठी भारताचा GDP वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के दरम्यान असण्याचा अंदाज आहे. जीएसटी (GST) कलेक्शनमध्ये अंदाजे ११ टक्के वाढ झाली असून, ती १०.६२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. (Economic Survey 2025)

दरम्यान या अर्थसंकल्पात मोदी (Narendra Modi) सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२५ साठी वास्तविक GVA वाढ ६.४ टक्के असण्याचा अंदाज आहे. आर्थिक दृष्टीकोनातून, ग्रामीण मागणीत वाढ झाल्यामुळे स्थिर किंमतींवर खासगी अंतिम उपभोग खर्च ७.३ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.नोव्हेंबर २०२४ पर्यंत, संरक्षण, रेल्वे आणि रस्ते वाहतूक भांडवली खर्चाच्या सुमारे ७५ टक्के वाटा असेल, तर ऊर्जा, अन्न आणि सार्वजनिक वितरणामध्ये लक्षणीय वार्षिक वाढ दिसून येईल. CPI आर्थिक वर्ष २०२४ मधील ५.४ टक्क्यांवरून एप्रिल-डिसेंबर २०२४ मध्ये ४.९ टक्क्यांवर घसरला आहे. ही घसरण FY२४ आणि एप्रिल-डिसेंबर २०२४ मधील कोर (अन्न, गैर-इंधन) महागाईत ०.९ टक्के पॉइंट घट झाल्यामुळे झाली आहे. (Economic Survey 2025)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.