राष्ट्रपतींबाबत सोनिया गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल काँग्रेस पक्षाने माफी मागावी, JP Nadda यांची मागणी

519

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session 2025) पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी Poor Lady म्हणजेच गरीब महिला असे संबोधले आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) खूप थकल्या आहेत. सोनिया गांधींच्या या वक्तव्याबाबत आता सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती (President) आणि आदिवासी समाजाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी यावेळी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  एक्सवर सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल पोस्ट केली आहे. (JP Nadda)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावर काँग्रस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींनी या भाषणाला कंटाळवाणे म्हटलं तर सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती भाषण करुन थकल्या आहेत, असं म्हटले आहे. सोनिया गांधी यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. सोनिया गांधी यांनी सर्वोच्च पदावर बसलेल्या आदिवासी महिलेचा अपमान केल्याचे केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल (Union Minister SP Singh Baghel) यांनी म्हटले आहे. काँग्रेस अशा शब्दांचा जाणीवपूर्वक वापर केल्याने काँग्रेसचा गरीब विरोधी, आदिवासी विरोधी स्वभाव पुन्हा दिसून येतो, असे भाजपाचे केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले. तसेच काँग्रेसने अध्यक्ष आणि आदिवासी समाजाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही यावेळी केली.

(हेही वाचा – Water Cut : मुंबईत तीस तासांचा पाणीब्लॉग; शहर आणि उपनगरांतील ‘या’ भागांमध्ये नसणार पाणी)

“सोनिया गांधी यांनी अभिभाषणाबाबत केलेले विधान योग्य नाही. राष्ट्रपतींनी आपले मत निर्भीडपणे मांडले आहे. सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी,” अशी मागणी भाजप खासदार संबित पात्रा यांनी केली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.