Ministry : मंत्रालयातील प्रतीक्षालयांवर मंत्र्यांची कार्यालये; अभ्यागतांना बसण्यासाठी जागाच उरली नाही

39
mantralaya mumbai : मंत्रालयामध्ये कोणकोणती कामे केली जातात, हे माहित आहे का तुम्हाला?
  • प्रतिनिधी

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयातील प्रतीक्षालयांच्या जागा कार्यालयांसाठी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यभरातून मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी हक्काची जागाच उरली नाही. “आम्ही कामासाठी मंत्रालयात (Ministry) यावे की नको?” असा प्रश्न आता अभ्यागत विचारू लागले आहेत.

मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांसाठी अडचणी वाढल्या

मंत्रालय (Ministry) हे राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक त्यांच्या विविध शासकीय कामांसाठी, तक्रारींसाठी किंवा मंत्र्यांना भेटण्यासाठी येथे येतात. आधीच मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी मोठी कागदपत्रे तपासणी, ओळखपत्रे व इतर प्रक्रिया पार करावी लागते. याशिवाय, संबंधित मंत्री किंवा अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी अनेक तास थांबावे लागते.

पूर्वी नागरिकांना थांबण्यासाठी प्रत्येक मजल्यावर वातानुकूलित प्रतीक्षालये होती. येथे आरामदायी खुर्च्या उपलब्ध असल्यामुळे नागरिक येथे निवांत बसू शकत होते. मात्र, आता नव्या मंत्र्यांनी त्यांच्या कर्मचारीवर्गासाठी या प्रतीक्षालयांवरच कार्यालये थाटायला सुरुवात केली आहे. परिणामी, राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांना आता मंत्रालयाच्या (Ministry) बाहेर लॉबीतच उभे राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

(हेही वाचा – Railway TC Body Camera: विनातिकीट प्रवाशांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; तिकीट तपासकांना मिळणार बॉडी कॅमेरा )

प्रत्येक मजल्यावर प्रतीक्षालयांवर ताबा

महायुती सरकारमध्ये ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री आहेत. यातील अनेक मंत्र्यांना त्यांच्या स्टाफसाठी जागेची कमतरता भासत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अभ्यागतांसाठी असलेल्या प्रतीक्षालयांवरच कार्यालय उभारण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

मंत्रालयातील (Ministry) विविध मजल्यांवरील प्रतीक्षालयांचा उपयोग खासदार, आमदार, शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येणारे नागरिक, महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक करत होते. मात्र, आता या प्रतीक्षालयांमधील खुर्च्या काढून तिथे प्लायवूडच्या भिंती उभ्या करून कार्यालयांचे बांधकाम सुरू आहे.

कोणत्या मंत्र्यांसाठी प्रतीक्षालये कार्यालयांमध्ये बदलली गेली?
  • पहिला मजला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मुख्य इमारतीतील प्रतीक्षालयाची जागा दिली.
  • दुसरा मजला : कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कार्यालयातील कर्मचारी याच प्रतीक्षालयात बसणार.
  • तिसरा मजला : मंत्री शंभूराज देसाई यांच्या कर्मचारीवर्गासाठी प्रतीक्षालयाची जागा ताब्यात घेतली.
  • चौथा मजला : माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या स्टाफसाठी प्रतीक्षालय हटवून कार्यालय उभारले.
  • पाचवा मजला : यापूर्वीच निर्धन व दुर्बल घटकांसाठी राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आला.

(हेही वाचा – Virat Kohli : राजीव शुक्ला व विराट कोहलीची दिल्लीत उपराष्ट्रतींशी भेट)

सामान्य नागरिकांसाठी मोठा प्रश्न

प्रत्येक मंत्री आपल्या स्टाफसाठी प्रतीक्षालयांचे रुपांतर कार्यालयांमध्ये करत असल्याने सामान्य नागरिकांना आता मंत्रालयात (Ministry) बसण्याची कोणतीही सोय उरलेली नाही. याचा सर्वाधिक फटका महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.

यापूर्वी प्रतीक्षालयांमध्ये बसून मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी ताटकळणाऱ्या लोकांना आता बाहेरील लॉबीतच उभे राहावे लागणार आहे, त्यामुळे गर्दी वाढून सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही समस्या निर्माण होऊ शकते.

(हेही वाचा – Water Cut : मुंबईत तीस तासांचा पाणीब्लॉग; शहर आणि उपनगरांतील ‘या’ भागांमध्ये नसणार पाणी)

सरकारला नागरिकांच्या सोयींपेक्षा मंत्र्यांची चिंता?

नागरिकांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, “मंत्रालय (Ministry) हे जनतेसाठी आहे की फक्त मंत्र्यांसाठी?” सामान्य जनतेला गृहित धरून त्यांची गैरसोय करणे कितपत योग्य आहे? सरकारने जर जनतेला गृहीत धरलेच नाही, तर नागरिकांनी मंत्रालयात यायचे तरी का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि प्रतीक्षालये पूर्ववत सुरू करावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा, यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही अनेक सामाजिक संघटनांनी इशारा दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.