Sewerage : मुंबईतील जीबीएस आजाराला आमंत्रण द्यायचे का? भाजपाच्या माजी नगरसेवकाने दाखला देत प्रशासनाला केला सवाल

319
Sewerage : मुंबईतील जीबीएस आजाराला आमंत्रण द्यायचे का? भाजपाच्या माजी नगरसेवकाने दाखला देत प्रशासनाला केला सवाल
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

अंधेरी पूर्व येथील मलनि:सारण वाहिनी ना. सी. फडके मार्गावर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामामध्ये सन २०२१ मध्ये फोडण्यात आली. परंतु तेव्हापासून आजतागायत पूल विभागाने समन्वय साधून मलवाहिनीचे काम सुस्थितीत केलेले नाही. परिणामी या मलवाहिनीचे (Sewerage) काम अद्यापही न झाल्याने या आजही या भागातील मल सेप्टीक टँकवरच आधारित आहे. मलवाहिनी कार्यान्वित न झाल्याने साई वाडीतील सेफ्टीक टँक भरुन वाहत त्यांतील मलमिश्रित पाणी पिण्याच्या टाकीत मिसळत आहे. परिणामी सुमारे ३ हजार कुटुंबांना दुषित पाण्याचा पुरवठा होत त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे साईनगरमधील कुटुंबांना जीबीएसचा आजार व्हावा ही महापालिका प्रशासनाची इच्छा आहे का? असा सवाल भाजपाचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.

(हेही वाचा – महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक; जिल्हाधिकारी Sanjay Yadav यांची माहिती)

अभिजित सामंत यांनी अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, अंधेरी पश्चिम येथील जीवा महाले मार्गावर अनेक वर्षांपासून अर्धवट सोडलेले मलनिःसारण वाहिनीचे काम सन २०१७ पासून पाठपुरावा केल्यानंतर शेवटी २०२० मध्ये या कामाला सुरुवात झाली. सन २०२१ मध्ये या मलवाहिनीचे (Sewerage) काम पूर्ण झाले. परंतु त्याचवेळी ना. सी. फडके मार्गवर उभारत असलेल्या उन्नत पुलाच्या कामाने मलनिःसारण वाहिनी पंक्चर केली. त्यामुळे पूल विभाग आणि मलनिःसारण विभाग यांच्याशी पाठ पुरावा केला. पण अजूनही तयार झालेल्या मलनिःसारण वाहिनी जोडण्यासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप सामंत यांनी या पत्राद्वारे केला आहे.

(हेही वाचा – Maritime Security साठी मोठा निर्णय; मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांना आधार कार्ड बाळगणे अनिवार्य)

तयार झालेल्या मलवाहिनीची (Sewerage) जोडणी न झाल्याने येथील साईवाडी विभागातील एसआरएमध्ये राहणाऱ्या सुमारे ३००० कुटुंबावर आरोग्य संकट उद्भवले आहे. सध्या धुमाकूळ घालणारा जीबीएस (GBS) हा जीवघेणा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे माध्यमातून कळत आहे, साईवाडी येथील मलवाहिनीच्या सेप्टिक टँकला गळती लागून जवळच्या पाण्याच्या टाक्यात यातील मलमिश्रित पाणी मिसळण्याची धोका वारंवार निर्माण होत आहे. हे सेप्टिक टँक मलनिःसारण वाहिनीस जोडल्यास हा धोका टळू शकतो व हजारो नागरिक या जीबीएस सारख्या व इतर आजाराच्या धोक्यापासून संरक्षित होऊ शकतात. परंतु मागील २ वर्षे होऊनही जर का पूल विभाग व मलनिस्सारण विभागातील अधिकारी एक पंक्चर काम पूर्ण करू शकत नसतील, तर मागील दोन वर्षे संबंधित विभागातील सबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सामंत यांनी केली आहे. मलनिःसारण कामाबाबत अनास्था ही जीबीएस सारख्या रोगांना आमंत्रित करू शकते. त्यामुळे महापालिकेने विशेष करून जल विभाग, मलनिस्सारण, घन कचरा विभागाने आळस झ्टकुन कामास लागावे आणि नागरिकांचे प्राण वाचवावे ही त्यांची प्राथमिकता असलीच पाहिजे असे सामंतांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.