Dawood Gang चा गुंड प्रकाश हिंगु तब्बल २९ वर्षांनी सापडला; मुंबई पोलिसांची कारवाई

63
Dawood Gang चा गुंड प्रकाश हिंगु तब्बल २९ वर्षांनी सापडला; मुंबई पोलिसांची कारवाई
  • प्रतिनिधी 

आर्थर रोड तुरुंगात १९९६ मध्ये झालेल्या गँगवॉरमधील दाऊद टोळीचा फरार गँगस्टर प्रकाश रतिलाल हिंगु (६३) याला २९ वर्षांनी मुंबई पोलिसांच्या एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याने कर्नाटक राज्यातील हुबळीतून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी केली आहे. (Dawood Gang)

प्रकाश रतीलाल हिंगु हा एकेकाळी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीत सक्रिय होता. अंधेरी जुहू लेन येथे एका चाळीत राहणारा हिंगु यांच्यावर ९०च्या दशकात दोन हत्येचे गुन्हे दाखल होते. १९९६ मध्ये प्रकाश हिंगु याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याची आणि दाऊदच्या इतर गुंडांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. (Dawood Gang)

(हेही वाचा – Flower Festival : मुंबईतील पुष्पोत्सवाला सुरुवात; राणीबागेत सर्व प्रकारच्या फुलांची झाडे न्याहाळता आणि खरेदी करता येणार)

या दरम्यान आर्थर रोड तुरुंगात छोटा राजन टोळीचे अनेक गुंड होते. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद आणि छोटा राजनमध्ये दरी निर्माण झाली होती. त्यावेळी छोटा राजनने दाऊदला संपविण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून दाऊद आणि छोटा राजनमध्ये वैर निर्माण झाले होते. त्याचे पडसाद १९९६ मध्ये आर्थर रोड तुरुंगात उमटले होते. दाऊद टोळीचे गुंड आणि छोटा राजन टोळीचे गुंड तुरुंगात एकमेकांसमोर येताच त्यांच्यात गँगवॉर पेटले होते. दोन्ही टोळ्यांकडून एकमेकांच्या गुंडांवर हल्ले करण्यात आले होते. याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दोन्ही टोळींच्या गुंडांवर परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Dawood Gang)

दाऊद टोळीवर दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रकाश रतिलाल हिंगु याचे आरोपी म्हणून नाव होते. त्याला अटक करण्यात आली होती. हिंगु याला न्यायालयाने जामिनावर सोडल्यानंतर तो फरार झाला होता. खटल्यादरम्यान, प्रकाश हिंगु वारंवार न्यायालयात हजर राहण्यात अयशस्वी ठरल्याने माननीय न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले होते. हिंगु याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडत नव्हता. एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे सपोनि. सोमनाथ देशमाने यांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आपल्या खबऱ्यांना सतर्क केले. खबऱ्यांनी दिलेल्या गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासातून हिंगु हा कर्नाटकातील हुबळी येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाली. (Dawood Gang)

(हेही वाचा – Leopard Safari: प्राणी प्रेमींसाठी आनंदाची वार्ता! आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार)

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनकर, पोनि. संदीप जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सोमनाथ देशमाने, पो. ह. विनायक विनायक जाधव, अविनाश चव्हाण आणि उमराणी या पथकाने कर्नाटक हुबळी येथून प्रकाश हिंगु याला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. प्रकाश हिंगु हा २०१६ मध्ये मुंबईतून कर्नाटक येथे कुटुंबासह पळून गेला होता. हुबळी येथे तो कुटुंबासह राहत होता, आणि धारवाड येथे एका बड्या हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी करीत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकाश हिंगु याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले यास्तव न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Dawood Gang)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.