Banganga Lake : बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी नवीन कंत्राटदाराची निवड

30
Banganga Lake : बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी नवीन कंत्राटदाराची निवड
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मलबार हिल येथील बाणगंगा तलावाच्या (Banganga Lake) पायऱ्या तोडण्यात आल्याने यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात आलेल्या या तलावाच्या कामाला खिळ बसली होती. परंतु या तलावाच्या सभोवतालचा परिसर, बाणगंगा तलाव स्वच्छता तसेच बाणगंगा तलावाच्या पायऱ्यांची, संधारक भितींची, दीपस्तंभाचे दुरूस्ती आणि इतर सुधारणा करण्याच्या कामांसाठी नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे बाणगंगाच्या रखडलेल्या कामाला आता गती प्राप्त होणार आहे.

(हेही वाचा – भाजपाच्या सदस्यता मोहिमेचा आढावा; Ravindra Chavan यांचे मार्गदर्शन)

बाणगंगा तलाव (Banganga Lake) हे मुंबईतील एक ऐतिहासिक महत्त्व असलेले प्रेक्षणीय स्थळ असून सध्या त्याची दुरावस्था होत चाललेली असल्याने तसेच बाणगंगा हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याने या तलावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा, मठ असून हे स्थान राष्ट्रीय महत्त्व असलेले सांस्कृतिक केंद्र आहे. या तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर राम मंदिर व वाळूकेश्वर मंदिर ई. प्रसिद्ध मंदिरे आहेत. पुरातन काळापासून बाणगंगा तलावास (Banganga Lake) धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्याने या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या तलावाचे प्राचीनकालीन महत्त्व लक्षात घेता या तलावास देशी तसेच विदेशी पर्यटक येत असल्याने या तलावाच्या पुरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कामे हाती घेतली. दरम्यान ही कामे सुरु असताना यासाठी नेमलेल्या कंत्राटदार कंपनीने पायऱ्याची हानी केली.

(हेही वाचा – Flower Festival : मुंबईतील पुष्पोत्सवाला सुरुवात; राणीबागेत सर्व प्रकारच्या फुलांची झाडे न्याहाळता आणि खरेदी करता येणार)

ऐतिहासिक अशा बाणगंगा तलाव (Banganga Lake) व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आतमध्ये एक्सकॅव्हेटर संयंत्र (Excavator) उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केली. तलावाच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यामुळे संबंधित कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे कंत्राट रद्द करून नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतल होता, त्यानुसार निविदा मागवण्यात आली होती. त्यानुसार, मागवलेल्या निविदेत बुकॉन इंजिनिअर्स अँड इंजिनिअर्स या कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीला पुढील १५० दिवसांमध्ये हे काम करणे अपेक्षित आहे. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.