केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman ) आज (१ फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष आज अर्थसंकल्पाकडे असेल. यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळणार की बजेट कोलमडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुक्रवारी (३१ जाने.) सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात 2047 पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ (developed nation) बनण्याच्या दृष्टीने पुढील एक किंवा दोन दशके आठ टक्क्यांहून अधिक विकास दर गाठावा लागेल, असे नमूद करण्यात आले आहे. (Budget 2025)
Union Minister for Finance and Corporate Affairs Smt. @nsitharaman interacts with the Secretaries and the senior officials involved in the Budget making process @FinMinIndia while giving final touches to the Union Budget 2025-26 at her office in North Block, in New Delhi, today.… pic.twitter.com/lXjk64WGsO
— Ministry of Finance (@FinMinIndia) January 31, 2025
दरम्यान या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होऊ शकतात, अशी शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बाजारपेठेतील मागणी घटली आहे. त्यासाठी मध्यमवर्गीयांना अधिकाअधिक सवलती आणि फायदे देऊन त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात उपाययोजना केल्या जाऊ शकतात. त्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदारांना त्यांच्या पगारावर आकारल्या जाणाऱ्या करातून जास्तीत जास्त सूट मिळेल, अशी अपेक्षा आहे. (Budget 2025)
करदात्यांना दिलासा मिळणार ?
नव्या करधोरणानुसार केंद्र सरकार (Central Govt) १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास कोट्यवधी नोकरदारांसाठी हा मोठा दिलासा असेल. तसंच १५ ते २० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना सध्या ३० टक्के कर द्यावा लागतो, हा कर २५ टक्के केला जाईल अशीही चिन्हं आहेत. असं झालं तर करदात्यांसाठी हा खरोखरच मोठा दिलासा असेल. (Budget 2025)
AI मुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार?
आर्थिक पाहणी अहवालातून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. AI मुळे मध्यमवर्ग आणि गरीबांसाठी चिंता निर्माण होऊ शकते. बेरोजगारी वाढू शकते आणि त्यांचे वेतन घटू शकते. एआयमुळे होणाऱ्या बदलांमध्ये जे विपरित परिणाम होणार आहेत ते कमी कसे करता येतील याबाबत विचार होणे गरजेचे आहे, अशी चिंता आर्थिक सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. (Budget 2025)
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?
महागाईचा बोजा कमी करण्यासाठी CII ची शिफारस मान्य करुन सरकार एक्ससाईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतं. असं झालं तर पेट्रोल आणि डिझेल (Petrol and diesel) यांचे दर कमी होतील. सध्याच्या घडीला पेट्रोलवर १९ रुपये ९० पैसे तर डिझेलवर १५ रुपये ८० पैसे एक्साइज ड्युटी घेतली जाते. या दरांमध्ये कपात झाल्यास पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. (Budget 2025)
घरं स्वस्त होणार ?
घरं स्वस्त केली जाण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली जाईल अशी शक्यता आहे. मेट्रो शहरांमध्ये परवडणारी घरं ४५ लाखांहून वाढवत ७० लाखांपर्यंत केली जाईल तर इतर शहरांमध्ये ही सीमा ५० लाखांपर्यंत केली जाईल. गृह कर्जावर मिळणाऱ्या व्याज सवलतीची रक्कम दोन लाख रुपये आहे जी पाच लाख रुपये केली जाईल अशीही शक्यता आहे. असं झाल्यास घर खरेदी करणाऱ्या अनेकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. (Budget 2025)
शेतकऱ्यांसाठी काय ?
पीएम किसान निधीची (PM Kisan Nidhi) रक्कम वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वार्षिक १२ हजार रुपये केली जाईल अशी शक्यता आहे. सध्याच्या घडीला सुमारे ९ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community