Pendrive Bomb : फडणवीस आणि शिंदेंच्या अटकेचा कट; मविआ सरकारच्या कटाच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत

176
Pendrive Bomb : फडणवीस आणि शिंदेंच्या अटकेचा कट; मविआ सरकारच्या कटाच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत
Pendrive Bomb : फडणवीस आणि शिंदेंच्या अटकेचा कट; मविआ सरकारच्या कटाच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत
राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना एका गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचा कट मविआच्या कार्यकाळात रचण्यात आल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शासनाने चौकशीचा आदेश दिला आहे.या चौकशीसाठी विशेष पथकाची (एसआयटी) स्थापन करण्यात आली असून या एसआयटीचे नेतृत्व मुंबई पोलिसांचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी करतील , असे  राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. (Pendrive Bomb)
एकनाथ शिंदे, आता उपमुख्यमंत्री, तेव्हा नगरविकास मंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा भाग होते. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरेंविरोधात बंड केले. डिसेंबर २०२४ मध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत दिलेल्या माहितीच्या आधारे एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे आदेशात म्हटले आहे. (Pendrive Bomb)
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा डाव असल्याचा दावा दरेकर यांनी केला होता. त्याच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले.चार सदस्यीय एसआयटीमध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक राजीव जैन पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहायक पोलिस आयुक्त आदिकराव पोळ यांचा एसआयटी मध्ये समावेश आहे.३० दिवसांत चौकशी पूर्ण करेल,त्याचा अहवाल गृहविभागाकडे सादर करण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे. (Pendrive Bomb)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.