मुंबईत (Mumbai) आता सार्वजनिक वाहतूक अर्थात टॅक्सी (Taxi) आणि रिक्षाचे (Rickshaw) दर महागले (Rickshaw, Taxi Fare Hike) आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी तसेच कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाली आहे. हे वाढीव दर आज १ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. (Rickshaw, Taxi Fare Hike)
वृद्धांसाठी मोफत प्रवासाची तरतूद सुरूच
मुंबई आणि मेट्रोपोलिटन भागात आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांना कमीत-कमी ३१ रुपये द्यावे लागणार आहेत. तर रिक्षाच्या प्रवासासाठी कमीत-कमी २६ रुपये द्यावे लागतील. मात्र महिलांना बसचं निम्म्या दरात तिकिटं मिळेल असं महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. तसंच वृद्धांसाठी मोफत प्रवासाची तरतूद सुरूच राहणार आहे. (Rickshaw, Taxi Fare Hike)
किती किलोमीटरसाठी किती दरवाढ?
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, दीड किलोमीटर अंतरासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सीचं किमान भाडं आता २८ ऐवजी ३१ रुपये असेल. तर दीड किलोमीटर अंतरासाठी ऑटो रिक्षाचं भाडं आता २३ ऐवजी २६ रुपये असणार आहे. (Rickshaw, Taxi Fare Hike)
बसच्या दरातही १५ टक्क्यांची वाढ
दरम्यान, विधानसभेआधी महायुती सरकारने महिलांना निम्म्या तिकिटात प्रवासाची सुविधा दिली होती. मात्र निवडणुकीनंतर बसच्या भाडे दरात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय विधानसभा निवडणुकीनंतर मात्र मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. मुंबईत बस दरवाढ नंतर आता टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्याही दरात वाढ झाली आहे. (Rickshaw, Taxi Fare Hike)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community