वैद्यकीय, तंत्रशिक्षण यांसारख्या अभ्यासक्रमात कालपर्यंत प्रादेशिक भाषांचा विशेष सहभाग नसल्याने विविध राज्यातील विद्यार्थ्यांना मर्यादा येत होत्या, मात्र आता केंद्र सरकारने यात अमुलाग्र बदल केला आहे. वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रम देशातील १३ प्रादेशिक भाषेत तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मराठी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. संशोधन आणि कौशल्य विकास अभ्यासक्रमात प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
काय म्हटले आहे या निर्णयात?
- वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा यापुढे देशातील १३ विविध भाषांमध्ये घेतली जाणार
- तंत्रशिक्षणातील जेईई (मेन) ही प्रवेशपूर्व परीक्षा यापूर्वी ३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जायची, यापुढे ती १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे.
- प्रादेशिक भाषांमध्ये तंत्रशिक्षण शिकवण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिली आहे.
- २०२१-२२ या वर्षासाठी हा प्रायोगिक तत्वावर निर्णय राबवण्यात येणार आहे. त्यासाठी ८ प्रादेशिक भाषांमध्ये तंत्रशिक्षण शिकवणाऱ्या संस्थांना परवानगी दिली जाणार आहे.
- ‘स्वयं’ या व्यासपीठावरून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे संदर्भ पुस्तकांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर केले जाणार आहे. जे नंतर ऑनलाइन कोर्स करणाऱ्यांना उपलब्ध होतील.
- प्रादेशिक भाषेत शिकवणाऱ्या तंत्रशिक्षण संस्थांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद त्या संस्थांना परवानगी देण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करणार आहे.
- हिंदी, बंगाली, मराठी, तेलगू, तमिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, आसामी आणि ओडिया या ८ भाषांमध्ये तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे भाषांतर तंत्रशिक्षण परिषद करणार आहे. त्याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
- तंत्रशिक्षण परिषद आणि हरियाणा सरकार यांच्यात करार झाला आहे, तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील १ हजार पुस्तकांचे हिंदी भाषेत भाषांतर करण्यात येणार आहे.
(हेही वाचा : परमबीर यांच्यावरील ‘त्या’ आरोपांचा असा होणार तपास)
Join Our WhatsApp Community