-
ऋजुता लुकतुके
रेल्वे विरुद्ध दिल्ली रणजी सामन्यात दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी अरुण जेटली स्टेडिअमवर मोठी गर्दी केली होती. पहिल्या दिवशी १५,००० तर दुसऱ्या दिवशी त्याहून जास्त चाहते मैदानावर होते. दिल्लीची फलंदाजी सुरू झाली होती. आणि त्यांना विराट कोहलीची फलंदाजी पाहायची होती. पण, ही गर्दी चहापानापूर्वीच ओसरली. कारण, विराट जेमतेम १५ चेंडू खेळपट्टीवर टिकला. आणि यात एक चौकार मारल्यावर पुढच्याच चेंडूवर त्रिफळाचित झाला. फलंदाजीतील तांत्रिक चुका विराटची पाठ सोडताना दिसत नाहीत. (Virat Kohli)
(हेही वाचा- Rickshaw, Taxi Fare Hike : रिक्षा, टॅक्सीचे नवीन दर लागू ; किती रूपयांनी महागला प्रवास ?)
रणजी सामन्यापूर्वी फलंदाजीचा सराव करताना त्याने बचावावर आणि त्यातही बॅकफूटवर फंलदाजी करण्यावर भर दिला होता. पण, ऐन सामन्यात तो खेळला फ्रंटफूटवर. क्रीझ सोडून पुढे आलेल्या विराटच्या बॅट आणि पॅडमध्ये मोठं भगदाड होतं. आणि चेंडू त्याच्या दोन्ही यष्ट्या उखडून गेला. हताश झालेला विराट तंबूत परतला. आणि चाहते तात्काळ मैदान सोडून गेले. (Virat Kohli)
दिल्लीच्या डावात २८ व्या षटकांत हिमांशू सांगवानने त्याचा बळी मिळवला. विराटसारखा बळी मिळवल्यामुळे रेल्वेच्या खेळाडूंनी जोरदार आनंद साजरा केला. पण, विराटला त्याची जुनी ड्राईव्हचा फटका खेळण्याची घाई नडली. (Virat Kohli)
(हेही वाचा- Ind vs Eng, 4th T20 : पुण्यातील सामना १५ धावांनी जिंकून भारताने मालिकाही जिंकली)
विराट १३ वर्षांनंतर दिल्लीकडून रणजी सामना खेळत आहे. आणि हे औचित्य साधून दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून त्याचा १०० कसोटी सामन्यांसाठी सत्कार करण्यात आला. मार्च २०२२ मध्ये विराट आपली १००वी आंतरराष्ट्रीय कसोटी खेळला होता. त्यानंतर भारतासाठी तो आणखी २३ कसोटी आतापर्यंत खेळला आहे. पण, मधल्या काळात आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात व्यस्त असलेल्या कोहलीचा सत्कार यापूर्वी शक्य झाला नव्हता. (Virat Kohli)
Moments of pride as Virat Kohli gets felicitated by DDCA for his 100th Test appearance! A true icon of Indian cricket.
Enjoy Full felicitation ceromany by DDCA. ✨pic.twitter.com/5y83yPjQnt
— Kohlistic🔥 (@Kohlistic18) January 31, 2025
भारतासाठी १०० कसोटी सामने खेळलेला विराट कोहली हा तिसरा दिल्लीकर खेळाडू आहे. यापूर्वी ईशांत शर्मा आणि विरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन विराटचा सत्कार केला. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community