Central Railway च्या ‘या’ मार्गावर असणार ट्रॅफिक ब्लॉक; जाणून घ्या काय असेल वेळापत्रक

46

कल्याण ते बदलापूर (Kalyan to Badlapur) आणि अंबरनाथ ते वांगणीदरम्यान (Ambernath to Wangani) १२ मीटर रुंदीचे पादचारी पूल, बदलापूर ते वांगणीदरम्यान ४ मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारण्यात येत आहे. पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी १ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. याच वेळेत कर्जत ते भिवपुरीदरम्यानच्या दोन्ही मागाँवर प्लेट गर्डरची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, ४ मेल-एक्स्प्रेस फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. (Central Railway)

■ स्थानक : कर्जत-भिवपुरी रोड 

मार्ग: अप डाऊन

वेळ : शनिवारी मध्यरात्री २ ते ३.३०

■ स्थानक : बदलापूर-वांगणी

मार्ग: अप आणि डाऊन मार्ग

वेळ : मध्यरात्री १.३० ते ३.०० पर्यंत

■ स्थानक : कल्याण-बदलापूर/अंबरनाथ-वांगणी

मार्ग: अप आणि डाऊन मार्ग

वेळ : शनिवार मध्यरात्री १.३० ते ३.३० पर्यंत

परिणाम: खालील सर्व मेल-एक्स्प्रेस कर्जत-पनवेलमार्गे वळवण्यात येणार असून, पनवेल आणि कल्याण स्थानकात थांबतील.

■ गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क

■ गाडी क्रमांक १८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी

■ गाडी क्रमांक १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेनसागर गाडी क्रमांक १११४० होसपेटे-सीएसएमटी

मुंबई उपनगरी रेल्वेवरील परिणाम

कल्याण आणि कर्जतदरम्यान लोकल रद्द

■ रात्री ११.५१ सीएसएमटी-कर्जत (शेवटची कर्जत लोकल)

■ पहाटे ३.३५ कर्जत-सीएसएमटी (पहिली सीएसएमटी लोकल)

असा असेल मेगाब्लॉक

रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक (Sunday Mega Block) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तर पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि कांदिवली स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवल्या जातील. यामुळे लोकल १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

(हेही वाचा – पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रसारित करण्यासाठी HNSC ची दिल्ली ते मुंबई सायकलयात्रा)

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway Mega Block) जोगेश्वरी आणि कांदिवली स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावर सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत वांद्रे टर्मिनस वरून सुटणाऱ्या सर्व मेल अंधेरी आणि बोरीवली दरम्यान डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.