Union Budget 2025 : निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा वाचा सविस्तर…

94
Union Budget 2025 : अर्थमंत्र्यांचा पगारदार मध्यमवर्गाला मोठा दिलासा; १२.७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे बजेट (Union Budget 2025) सादर करत आहेत. कॅबिनेट बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करत आहेत.

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा (Union Budget 2025)

1. किसान क्रेडिट कार्डावरील कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख
उत्तम प्रतीच्या कापूस उत्पादनासाठी योजना सुरू करणार. युरिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करणार. किसान क्रेडिट कार्डावरील (Kisan Credit Card) कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. (Union Budget 2025)

2. राज्यांसोबत पीएम कृषी धान्य योजना सुरू करणार
अर्थसंकल्पातून निर्यात वाढवण्याचे प्रयत्न करणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. राज्यांसोबत पीएम कृषी धान्य योजना सुरू करणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. योजनेंतर्गत १०० जिल्ह्यांना विशेष फायदा होणार आहे. याचा फायदा देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना होणार. (Union Budget 2025)

3. कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी पावलं उचलली जाणार
कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी पावलं उचलली जाणार. डाळींसाठी ६ वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजनेची घोषणा. केंद्राच्या एजन्सी पुढील ४ वर्षांत तूर, उदड आणि मसुर डाळ खरेदी करणार. बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. (Union Budget 2025)

4. बिहारमध्ये फूड टेक्नॉलॉजी
बिहारमध्ये फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट इन्स्टिट्युट सुरू करणार. याशिवाय देशात एआयच्या अभ्यासाठी तीन केंद्र उभारली जाणार. कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर करणार. वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात १० हजार जागा वाढवल्या जाणार. ५ वर्षांमध्ये ७५ हजार जागा वाढवल्या जाणार. भारतीय भाषांमधील पुस्तकांना चालना देणार. सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० ची सुरूवात करणार. (Union Budget 2025)

 

महत्त्वाचे मुद्दे :

  • आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारणार.
  • सूक्ष्म व लघू उद्योगातून देशातील 7.5 कोटी लोकांना रोजगार.
  • मत्स्य पालनाला प्रोत्साहन देण्यावर भर.
  • एससी एसटी महिलांना उद्योगासाठी 2 कोटी रुपयांचं कर्ज देणार.
  • वैद्यकीय शिक्षणाच्या 75 हजार जागा वाढवणार.
  • गरीब, युवा, अन्नदाता आणि महिलांवर यंदाच्या अर्थसंकल्पात भर.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.