पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आर्थिक विकासाला गती देऊ, असे म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांनी शेतकरी, तरुण आणि महिला सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सुरुवातीलाच घोषित केले. अर्थमंत्री सभागृहात येताच विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. या वेळी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात मौनी अमावास्येच्या रात्री झालेल्या दुर्घटनेवरून विरोधकांनी घोषणाबाजी केली, तसेच मृतांचा आकडा घोषित करा, अशी मागणी करत सभात्याग केला. विरोधकांना हात उंचावून नमस्कार करत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरु केले. (Union Budget 2025)
(हेही वाचा – Economic Survey 2025 : आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर आलेले महत्त्वाचे आकडे काय सांगतात?)
या वेळी अर्थमंत्र्यांनी मेक इन इंडियावर भर देणार असल्याची घोषणा केली. शेती; सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) आणि निर्यात ही भारतीय अर्थव्यवस्थेची ३ इंजिने आहेत, असे अर्थमंत्री म्हणाल्या. शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचे पहिले इंजिन असल्याचे सांगत सुरुवातीला कृषिक्षेत्रासाठीच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. १०० जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना, मच्छिमारांसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन, बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना, ७ कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार यांसारख्या आकर्षक घोषणा केल्या. (Union Budget 2025)
हेही पहा –