khadakwasla lake : मुंबईतली चौपाटी माहितीय, पण खडकवासला धरणाजवळ आहे पुण्याची चौपाटी, हे माहितीय का?

28
khadakwasla lake : मुंबईतली चौपाटी माहितीय, पण खडकवासला धरणाजवळ आहे पुण्याची चौपाटी, हे माहितीय का?

खडकवासला धरण हा पुण्याच्या बाहेर असलेला एक पिकनिक स्पॉट आहे. खडकवासला तलावापासून बनलेलं हे धरण निसर्गप्रेमी आणि साहसी क्रीडाप्रेमींना आकर्षित करतं. इथले स्थानिक लोक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी या तलावाला भेट देतात.

जर तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांत झाडांखाली आराम करायला आवडत असेल, तर हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखं आहे. तसंच इथे जवळच तुम्ही खडकवासला धरण कॅम्पिंगचा आनंदही घेऊ शकता. (khadakwasla lake)

या पिकनिक स्पॉटजवळ तुम्हाला अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि रस्त्यावर फेरीवाले देखील दिसतील. दररोज संध्याकाळी इथे फास्ट फूड, स्थानिक नाश्ता आणि चहाचे स्टॉल लागतात. म्हणूनच या ठिकाणाला “पुणे चौपाटी” असंही टोपणनाव देण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Union Budget 2025 : मध्यमवर्गीयांचा खिसा भरणार अर्थसंकल्प; PM Narendra Modi यांनी केले कौतुक)

खडकवासला धरणाचा इतिहास

पुणे इथलं खडकवासला धरण १९ व्या शतकात बांधण्यात आलं होतं. ब्रिटिश काळात पूर्व पुण्यात आलेल्या तीव्र दुष्काळानंतर कॅप्टन फिफ रे यांनी हे धरण बांधण्याची योजना आखली होती. धरणाच्या बांधकामातही त्यांचा सहभाग होता. म्हणून १९४७ सालापर्यंत इथल्या तलावाला फिफ लेक असं म्हटलं जायचं. १८६९ साली खडकवासला धरणाचं बांधकाम सुरू झालं आणि १८७९ साली धरण बांधून पूर्ण झालं. इथलं मूळ धरण १९६१ साली पुरामुळे उद्ध्वस्त झालं होतं. पण ते धरण लवकरच पुन्हा बांधण्यात आलं. (khadakwasla lake)

खडकवासला धरणाच्या भागात करण्यासारख्या गोष्टी :
  • कुटुंबासोबत पिकनिकची मजा – खडकवासला धरण हे वीकेंडची सुट्टी घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. आजूबाजूला हिरवळ असलेले हे हवेशीर आणि धुकं असलेलं ठिकाण शहराच्या धकाधकीच्या जीवनातून आवश्यक असलेली विश्रांती आणि रिफ्रेश वाटण्यासाठी चांगलं वातावरण प्रदान करतं.
  • सूर्योदय/सूर्यास्त पाहणे – बहुतेक पर्यटक आणि पुण्यातले स्थानिक लोक हे तलावाजवळ भव्य सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी या ठिकाणी भेट देतात. खडकवासला धरणाच्या सूर्यास्त बिंदूवरून, तुम्हाला झाडांच्या मागे सोनेरी आकाश आणि संध्याकाळच्या सूर्यास्ताचे एक विहंगम दृश्य दिसू शकतं. या वेळेत तुम्ही काही सुंदर छायाचित्रेही टिपू शकता.
  • स्थानिक नाश्त्याचा आस्वाद घेणे – खडकवासला धरण पिकनिक स्पॉट हा स्थानिक नाश्त्यासाठी देखील लोकप्रिय आहे. इथे रस्त्याच्या कडेला भाजी, भेळ, भुट्टा आणि इतर चविष्ट पदार्थ विकणारी अनेक खाण्याचे स्टॉल्स असतात. येथे उकडलेले कॉर्न, भाजलेले शेंगदाणे आणि फळे देखील विकली जातात. तसंच गरम चहा आणि फास्ट फूड देखील इथे खायला मिळतील.
  • धरणाजवळ कॅम्पिंग – खडकवासला धरण पर्यटन स्थळाभोवतीचा परिसर हा कॅम्पिंगचा आनंद घेण्यासारखा आहे. तसंच धरणाजवळ ट्रेकिंगही करता येते. जर तुम्ही जवळच्या पानशेत धरणाला भेट दिली तर तुम्ही साहसी जलक्रीडा देखील अनुभवू शकता.
  • पर्यटन स्थळे – खडकवासला धरणाजवळ विविध निसर्गरम्य पर्यटन स्थळं आहेत. जसं की, नीलकंठेश्वर मंदिर, पीकॉक बे आणि कुडजे गाव ही खडकवासला धरणाच्या जवळची काही ठिकाणं आहेत. (khadakwasla lake)

(हेही वाचा – Union Budget 2025 : “घराघरात लक्ष्मीची पावलं…” , अर्थसंकल्पावर काय म्हणाले Eknath Shinde ?)

खडकवासला धरणाला भेट देण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क

खडकवासला धरणाला भेट देण्याची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे. इथे वेळेचं कोणतंही बंधन नाही. त्यामुळे तुम्ही कधीही ते पाहू शकता. रात्रीच्या वेळीही खडकवासला धरणाला जाऊ शकता, पण त्या वेळेत आनंद घेण्यासाठी फारसं काही उपलब्ध नाही.

खडकवासला धरणाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ

खडकवासला धरण आणि चौपाटीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात जुलै ते ऑगस्ट दरम्यानचा काळ होय. याव्यतिरिक्त हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यानही तुम्ही भेट देऊ शकता.

या दिवसांत तुम्हाला सगळीकडे सुंदर हिरवळ पसरलेली दिसेल. विशेषतः संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही विकेंड्सला भेट दिली तर तुम्हाला एक शांत संध्याकाळ अनुभवता येते. (khadakwasla lake)

खडकवासला धरण एक्सप्लोर करण्यासाठी लागणारा वेळ

खडकवासला धरणाच्या परिसरात तुम्ही सुमारे १ ते २ तास घालवू शकता. पण पुण्याहून खडकवासला धरणापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे एक तासापेक्ष जास्त वेळ लागू शकतो. जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर पानशेत धरणालाही नक्की भेट द्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.