Union Budget 2025 : शेतकरी, मध्यमवर्गीयांना फायदा देणारा अर्थसंकल्प; CM Devendra Fadnavis यांच्याकडून स्वागत

38

सरकारने 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार. युवांसाठी वेगवेगळे मिशन आणि स्वप्नांना भरारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चालला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवार, 1 फेब्रुवारला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) मांडण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

(हेही वाचा Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय कोणते ?)

या बजेटमधून (Union Budget 2025) महाराष्ट्राला मोठा निधी मिळेल. हा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा देणारा आहे. यामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांना मोठा फायदा झाला आहे. शेती क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठी घोषणा करण्यात आली. कापसाच्या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन आहे. 55 हजार हेक्टरवर आपल्या राज्यात कापसाचे उत्पादन होते. हेल्थ क्षेत्र बघितले तर कॅन्सरसारख्या वेगाने वाढणाऱ्या आजाराला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 200 डे केअर सेंटर एकाच वर्षांत सुरू करण्यात येणार आहे. परदेशात त्यांच्यावर चांगले औषधी आहेत त्यावर मोठी ड्युटी असल्याने ते घेता येत नव्हते ती आता संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी हा चांगला निर्णय आहे. (Union Budget 2025)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.