-
ऋजुता लुकतुके
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीय आणि पगारदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. नवीन कर प्रणालीनुसार विवरणपत्र भरणाऱ्यांना आता एकूण १२ लाख ७० हजार रुपयांपर्यंत कुठलाही आयकर भरावा लागणार नाही. यात १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल तर ७०,००० रुपयांची प्रमाणित वजावटही लागू होईल. शिवाय या प्रणालीत करांचे दरही बदलण्यात आले आहेत. (Union Budget 2025)
ज्येष्ठ नागरिकांना टीडीसीएसमध्येही मोठी सवलत सरकारने जाहीर केली आहे. आता १,००,००० रुपयांपर्यंतच्या टीडीएसवर त्यांना सूट मिळणार आहे. याआधी ही मर्यादा ५०,००० रुपये इतकी होती. यामुळे १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर आता ८०,००० रुपयांची बचत होणार आहे. तर २५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १ लाख २० हजार रुपयांची बचत होणार आहे. (Union Budget 2025)
(हेही वाचा – Union Budget 2025 : नितीन गडकरी यांनी पंतप्रधान व अर्थमंत्र्यांचा केला गौरव)
#UnionBudget2025 | “The middle class provide strengths to the economy. In recognition of their contribution, we have periodically reduced the tax burdens. I am now happy to announce that there will be no income tax up to an income of Rs 12 lakhs.”says Finance Minister Nirmala… pic.twitter.com/9IVCnhEUb1
— ANI (@ANI) February 1, 2025
१२ लाखांच्या वर सुधारित करांचे दर पुढील प्रमाणे आहेत –
० ते ४ – करमुक्त
४ ते ८ – ५ टक्के
८ ते १२ लाख – १० टक्के
१२ ते १६ लाख – १५ टक्के
१६ ते २० लाख – २० टक्के
२० ते २४ लाख – २५ टक्के
२४ लाखापुढे – ३० टक्के
(हेही वाचा – Sairaj Bahutule Quits : साईराज बहुतुलेचा क्रिकेट अकादमीतून राजीनामा)
पुढील आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवीन आयकर विधेयक मांडणार आहेत. त्यात आयकर विवरणपत्र अधिक सोपं व सुटसुटीत करण्यासाठी बदल करण्यात येणार असल्याचं सीतारमण यांनी म्हटलं आहे. तसंच आयकर रचनाही सोपी करण्यात येणार आहे. (Union Budget 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community