परिवहन मंत्री Pratap Sarnaik कर्नाटक दौऱ्यावर

कर्नाटकच्या परिवहन सेवांचा सखोल अभ्यास करणार

104
परिवहन मंत्री Pratap Sarnaik कर्नाटक दौऱ्यावर
  • प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे १ व २ फेब्रुवारी रोजी कर्नाटक दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) सेवांची माहिती घेणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मैद आणि महाव्यवस्थापक (यंत्र) नंदकुमार कोलारकर हे देखील सहभागी होत आहेत.

कर्नाटकच्या परिवहन व्यवस्थेचा अभ्यास

कर्नाटक राज्यातील परिवहन सेवा गरुडा, ऐरावत, अंबारी यांसारख्या उच्चस्तरीय लांब पल्ल्याच्या बस सेवांसाठी ओळखली जाते. तसेच, त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रोत्साहन योजनांची माहिती घेऊन, त्या महाराष्ट्रातील एसटी महामंडळात कशा लागू करता येतील याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Union Budget 2025 : नितीन गडकरी यांनी पंतप्रधान व अर्थमंत्र्यांचा केला गौरव)

कर्नाटकच्या परिवहन मंत्र्यांसोबत बैठक

दौऱ्यादरम्यान कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासोबत सरनाईक (Pratap Sarnaik) यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत दोन्ही राज्यांतील परिवहन व्यवस्थेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळातील प्रवासी सेवा सुधारण्यासाठी आणि नव्याने आधुनिक सेवा सुरू करण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल.

पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाचा प्रभाव

सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या चांगल्या योजनांचा अभ्यास करून त्या आपल्या राज्यात लागू कराव्यात. याच दृष्टीने महाराष्ट्र सरकार कर्नाटकच्या परिवहन व्यवस्थेचा अभ्यास करून त्यातील नाविन्यपूर्ण कल्पना एसटी महामंडळात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.

(हेही वाचा – Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय कोणते ?)

एसटी महामंडळात नव्या सुधारणा येण्याची शक्यता

कर्नाटकातील आधुनिक बससेवा आणि कर्मचाऱ्यांसाठीच्या धोरणांचा अभ्यास करून महाराष्ट्रात प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एसटी महामंडळातील तांत्रिक सुधारणा, कर्मचाऱ्यांसाठीच्या नवीन प्रोत्साहन योजना, तसेच दीर्घ पल्ल्याच्या बस सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणते बदल करता येतील, यावर या दौऱ्यात सखोल विचार केला जाणार आहे.

या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या सेवांमध्ये सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.