केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचे बजेट (Union Budget 2025) सादर केले. कॅबिनेट बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Union Budget 2025)
◻️LIVE 📍 ठाणे 🗓️ 01-02-2025 📹 केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ विषयी माध्यमांशी संवाद – लाईव्ह https://t.co/pI6r6bcTMy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 1, 2025
एकनाथ शिंदे म्हणाले, “देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी (PM Modi) विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत.” (Maharashtra Union Budget 2025)
लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या…
देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 1, 2025
“एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो.” (Union Budget 2025)
हेही वाचा-Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय कोणते ?
“शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत.” असं शिंदे म्हणाले. (Union Budget 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community