छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हिंदूंच्या (Hindu) धर्मांतराचा कट रचल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी उपचाराच्या नावाखाली धर्मांतरासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेचा कट हिंदू (Hindu) संघटनांनी उधळला. या सभेत उपचारासाठी महिला आणि मुलांसह १० लोक उपस्थित होते. यावेळी पाद्रीने हिंदू (Hindu) देवी-देवतांबद्दल अश्लील टिप्पणी केल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे. त्यातच धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पाद्री कीर्ती कुमार केशरवानी (Kirti Kumar Kesharwani), महारथी बंजारे (Maharathi Banjare) आणि जीवनलाल साहू (Jeevanlal Sahu) यांना अटक केली आहे.
( हेही वाचा : Union Budget 2025 : अर्थमंत्र्यांचा पगारदार मध्यमवर्गाला मोठा दिलासा; १२.७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त)
मुळात दि. २६ जानेवारी रोजी हिंदू (Hindu) संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली की, पंडारी पोलीस स्टेशन परिसरातील मितान विहारमध्ये उपचारासाठी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लोकांचे धर्मांतर केले जात आहे आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जात आहे, अशी माहिती हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. यानंतर, हिंदू संघटनांशी संबंधित कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच शहराचे अतिरिक्त एसपी लखन पटले हे देखील पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान एका वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, एफआयआरनुसार, पाद्री कीर्ती कुमार केशरवानी (Kirti Kumar Kesharwani) आणि त्यांचे सहकारी उपचार सभेत हिंदू देवी-देवतांना येशू ख्रिस्तापेक्षा कनिष्ठ दर्जाचे असल्याचे सांगत अवमान करत होते. तसेच लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत होते. त्याचबरोबर ख्रिस्ती धर्म स्विकारल्याने सर्व दु: ख दूर होतात, असे त्यांचे म्हणणे होते.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की गेल्या ९ वर्षांपासून येथे राहणाऱ्या पाद्रीने घरात एक छोटेखानी चर्च बांधले आहे. येथे लोकांना ख्रिश्चन धर्म (Christianity) स्वीकारण्यासाठी अनेक प्रकारे आमिष दाखवले जाते आणि प्रलोभने दाखवली जातात. लोकांचे म्हणणे आहे की, यात गरीब आणि व्याधीग्रस्त हिंदूंना लक्ष्य केले जाते आणि त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवले जाते.
घटनेच्या दिवशी पाद्री चार हिंदू कुटुंबांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करत होता. पाद्री आणि त्यांचे साथीदार केरळच्या बिलीव्हर्स ईस्टर्न चर्चशी संबंधित आहेत. सिव्हिल लाईनचे सीएसपी अजय कुमार (Ajay Kumar) म्हणाले की, माया अग्रवाल यांनी पाद्री कीर्ती कुमार केशरवानी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. दर रविवारी त्यांच्या घरी प्रार्थना सभा होत असे. त्या प्रार्थना सभेला उपस्थित राहण्यासाठी अनेक कुटुंबे येत असतं. तरी हा मोठ्या कटाचा भाग असल्याचे हिंदू (Hindu) संघटनांचे म्हणणे आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community