गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात (weather) चढ- उतार होताना दिसत आहे. कधी ढगाळ (Cloudy) वातावरण, कधी कडाक्याची थंडी (Cold) तर कधी अवकाळी पावसाचा (Rain) अंदाज या वारंवार होणाऱ्या बदलामुळे राज्यात नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी आता फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्याच उन्हाच्या झळा आणखी तीव्र होच असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता मध्य महाराष्ट्र, कोकणात तापमानाचा आकडा सरासरीपेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. अचानक वाढलेल्य़ा या उकाड्यामुळं राज्यावर पावसाळी ढगांचं सावटही पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather Update)
का होत आहेत तापमानातील बदल?
पॅसिफिक महासागरात (Pacific Ocean) सध्या ‘ला नीना’ ही प्रणाली सक्रिय असून, समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीहून जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर तिचे परिणाम कमी होण्यास सुरुवात होईल.संपूर्ण देशातील हवामानावर याचे परिणाम सध्या दिसत असून, फेब्रुवारी महिना फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी तापमानवाढीला असेल असं आयएमडीनं (IMD) स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचा – Union Budget 2025 : शेतकरी, मध्यमवर्गीयांना फायदा देणारा अर्थसंकल्प; CM Devendra Fadnavis यांच्याकडून स्वागत)
राज्यात प्रामुख्यानं कोकण किनारपट्टी क्षेत्रामध्ये सरासरीहून अधिक तापमान राहणार असून, यंदा उकाडा तुलनेनं आधीच सुरू होणार आहे. नवी मुंबई, पश्चिम उपनगरं आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रात्री उशिरा तापमानात घट नोंदवली जाणार असली तरीही हा गारठा फार काळ टीकणारा नाही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community