Union Budget 2025 : विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा अर्थसंकल्प – अशोक चव्हाण

45
Union Budget 2025 : विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा अर्थसंकल्प - अशोक चव्हाण
  • प्रतिनिधी 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा आहे. समाजातील सर्वच घटकांच्या विकासाला गती व गुंतवणुकीला चालना देण्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे रोजगार निर्मिती होईल, क्रयशक्ती वाढेल आणि देशाच्या अर्थकारणाला अधिक वेग मिळेल. गरीब, युवा, शेतकरी आणि नारीशक्तीसाठी तरतूद करण्यात आली आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गाला दिलासा दिला आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. एमएमएमईसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर पाच कोटी रुपयांवरून 10 कोटी करुन मध्यमवर्ग, शेतकरी आणि उद्योजकांना बळ दिले आहे. (Union Budget 2025)

कापूस, तूर व मसूरचे उत्पादन वाढवणे आणि डाळींच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह आहे. जीवनरक्षक व कँसरवरील औषधे स्वस्त केल्याने उपचारावरील खर्च कमी होईल. लिथियम आयन बॅटरी स्वस्त करण्याच्या प्रस्तावातून इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. ‘इंडियन पोस्ट’ला एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेत रुपांतरीत करण्याच्या निर्णयाने देशातील या जुन्या व महत्त्वपूर्ण यंत्रणेला नवसंजीवनी मिळेल. (Union Budget 2025)

भारताच्या विकासाचा बजेट – रक्षा खडसे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘मिशन-2047’चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शेतकरी, महिला, युवा, गरिबांचा आर्थिक विकास कसा होईल, याचा सारासार विचार बजटमध्ये केला आहे. स्वयंसहायता बचत गट आणि महिला मंडळांच्या माध्यमातून लहान-लहान उद्योग सुरू करता येणार आहे. स्टार्टअपची मर्यादा 20 कोटी केली आहे. मच्छिमारांचे उत्पादन वाढविण्यासाठी खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Union Budget 2025)

(हेही वाचा – Union Budget 2025 : शेतकरी, मध्यमवर्गीयांना फायदा देणारा अर्थसंकल्प; CM Devendra Fadnavis यांच्याकडून स्वागत)

मास्टर स्ट्रोक बजेट – डॉ. श्रीकांत शिंदे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खऱ्या अर्थाने ‘कॉमन-मॅन’चा बजेट सादर केला आहे. 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याने मध्यमवर्गाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. पायाभूत सुविधा, कृषी, मेडिकल अशा विविध क्षेत्राला गतीमान करणारे हे बजेट आहे. तीन वर्षांत कॅन्सरचा उपचार प्रत्येक जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांसाठी तेलबिया आणि किसान क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्यात आली आहे. अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली. (Union Budget 2025)

देशाला प्रगतीकडे नेणारा बजेट – मेधा कुलकर्णी

केंद्र शासनाचे या वर्षीचे बजेट सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारे, सर्वांना सोबत घेऊन विकास करणारे आहे. 12 लाखांपर्यंत टॅक्स माफ केला आहे. शेती, एमएसएमई, गुंतवणूक व निर्यात या चार घटकांना विकास इंजिन संकल्पून योजना आखून नियोजन करण्यात आले आहे. गरीब, युवा, अन्नदाता व नारी या चार घटकांच्या प्रामुख्याने सक्षमीकरणावर भर दिला आहे. एमएसएमईची मर्यादा 5 कोटींवरून 10 कोटी केली आहे. सक्षम अंगणवाडी, पोषण उपक्रम, कॅन्सरसारखे दुर्धर रोगांवरील उपचार, विद्यापीठांचे पुर्नरूज्जीवन व भारतीय ज्ञान डिपॉझिटरी, अणु-ऊर्जा मिशन अश्या सर्वच क्षेत्रात हा अर्थसंकल्प देशाला नवीन दिशा व प्रगतीकडे नेणारा आहे. (Union Budget 2025)

(हेही वाचा – Union Budget 2025 : अर्थमंत्र्यांचा पगारदार मध्यमवर्गाला मोठा दिलासा; १२.७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त)

अर्थ संकल्पावर दिल्लीमधील व्यापारी वर्ग आनंदी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी आठव्या वेळी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी बर्‍याच मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अंतर्गत दिल्लीच्या बाजार संघटनांनी 2025 बजेटवर आनंद व्यक्त केला आहे.

व्हॉइस ऑफ बँकिंगचे संस्थापक अश्वनी राणा म्हणाले की, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कृषी आणि महिलांवर लक्ष केंद्रीत केले. पंतप्रधान योजनेचा प्रस्ताव चांगला आहे. केसीसीची मर्यादा 3 ते 5 लाखांपर्यंत शेतकर्‍यांपर्यंत वाढविण्यात आली. याचा फायदा शेतकर्‍यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी होईल. (Union Budget 2025)

दिल्ली हिंदुस्थानी मर्केंटाईल असोसिएशनचे प्रमुख सुरेश बिंदल म्हणाले की, हे बजेट सर्व सामान्यांना जपणारे आहे. देशाच्या अर्थमंत्री यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. ज्याचा सर्व वर्गावर चांगला परिणाम होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.