katraj snake park lake : १३ फूट लांब किंग कोब्रा पाहायचा असेल तर कात्रज स्नेक पार्कला अवश्य भेट द्या!

35
katraj snake park lake : १३ फूट लांब किंग कोब्रा पाहायचा असेल तर कात्रज स्नेक पार्कला अवश्य भेट द्या!

पुण्यातल्या कात्रज इथलं स्नेक पार्क हे निसर्ग आणि वन्यजीवांवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी एक पसंतीचं पर्यटन स्थळ आहे. इथे विविध प्रकारचे साप, इतर सरपटणारे प्राणी आणि कासवं आहेत.

१३ फूट लांबी असलेला किंग कोब्रा हा या स्नेक पार्कचं प्रमुख आकर्षण आहे. या स्नेक पार्कमध्ये तुम्हाला शैक्षणिक अनुभवही घेता येतो. इथे एक ग्रंथालयही आहे. याव्यतिरिक्त इथले व्यवस्थापक सापांशी संबंधित मिथक आणि शंका दूर करण्यासाठी कार्यक्रम देखील आयोजित करतात. कात्रज इथलं स्नेक पार्क हे पुणे-सातारा महामार्गावरचं राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचाच एक भाग आहे. या ठिकाणी हजारो पर्यटकांना आकर्षित करणारे वन्यजीव व इतर प्राणी आहेत. (katraj snake park lake)

(हेही वाचा – khadakwasla lake : मुंबईतली चौपाटी माहितीय, पण खडकवासला धरणाजवळ आहे पुण्याची चौपाटी, हे माहितीय का?)

कात्रज स्नेक पार्क, पुणे इथला इतिहास

पुण्यातलं कात्रज स्नेक पार्क हे १९८६ साली स्थापन करण्यात आलं होतं. नीलम कुमार खैरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या मदतीने हे स्नेक पार्क बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता.

त्यानंतर १९९७ साली पुणे महानगरपालिकेने या जागेचा अधिक विकास करण्याचा आणि जवळच्या पेशवे उद्यानातल्या सर्व प्राण्यांना इथे ठेवण्याचा निर्णय घेतला. १९९९ सालापर्यंत कात्रज सर्प उद्यानाचा विस्तार करून राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली होती. (katraj snake park lake)

कात्रज स्नेक पार्कमध्ये करण्यासारख्या गोष्टी
  • सापांना त्यांच्या अधिवासात पाहणे – या सर्प उद्यानात २० पेक्षा जास्त प्रजातींचे साप आहेत. या अद्भुत संग्रहात इंडियन रॉक पायथॉन, व्हायपर स्नेक आणि किंग कोब्रा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त कात्रज स्नेक पार्कमध्ये तुम्हाला भारतीय मगरी, कासव आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी देखील आढळतात.
  • प्राणीसंग्रहालयाला भेट देणे – शेजारीच असलेल्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात इतर अनेक प्राणी आणि पक्षी आहेत. येथे आढळणाऱ्या अनेक प्राण्यांच्या प्रजातींपैकी पांढरा वाघ, स्लॉथ बेअर आणि बार्किंग डियर हे प्राणी आहेत.
  • तलावात बोटिंग करणे – कात्रज स्नेक पार्क आणि प्राणीसंग्रहालय हे एका मोठ्या तलावाभोवती बांधलेलं आहे. तुम्ही या तलावात बोटिंग करू शकता किंवा हिरव्यागार नयनरम्य परिसरात बसू शकता.
  • ग्रंथालयाची तपासणी करणे – या परिसरातल्या ग्रंथालयात सापांबद्दल भरपूर माहिती आहे. स्नेक पार्कमधल्या आणि जगभरातील विविध प्रकारच्या सापांवर पुस्तकं आणि माहितीपत्रकं पाहायला मिळतील. ही सगळी माहिती ब्रेल लिपीमध्ये देखील उपलब्ध आहे.
  • सापांविषयीच्या जागरूकता कार्यक्रमांना उपस्थित राहणे – कात्रज इथलं स्नेक पार्क हे वर्षभर सर्प जागरूकता कार्यक्रम आयोजित करते. नागपंचमीच्या सर्प महोत्सवादरम्यान सापांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाला परावृत्त करण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. त्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जातं.

(हेही वाचा – Union Budget 2025 : “घराघरात लक्ष्मीची पावलं…” , अर्थसंकल्पावर काय म्हणाले Eknath Shinde ?)

कात्रज स्नेक पार्कच्या वेळा आणि प्रवेश शुल्क 
  • कात्रज स्नेक पार्क हे बुधवार वगळता आठवड्यातले सर्व दिवस खुले असते. तुम्ही वीकेंडला तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासह सहलीची योजना आखू शकता आणि इथल्या सापांसोबत एक दिवस घालवू शकता.
  • स्नेक पार्क हे सकाळी १०.३० वाजता उघडतं आणि संध्याकाळी ६ वाजता बंद होतं.
  • हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात (ऑगस्ट ते फेब्रुवारी) हवामान आल्हाददायक असताना येथे येणं चांगलं ठरेल.
  • हे स्नेक पार्क राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारात आहे. (katraj snake park lake)
तिकिटांची किंमत पुढीलप्रमाणे :

प्रौढांसाठी – ₹४०, मुलांसाठी – ₹१० आणि परदेशी नागरिकांसाठी – ₹१००

व्यावसायिक छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीसाठी, अतिरिक्त शुल्क आकारलं जातं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.