Union Budget 2025 : सर्वसमावेशी आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करणारा अर्थसंकल्प – मुरलीधर मोहोळ

37
Union Budget 2025 : सर्वसमावेशी आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करणारा अर्थसंकल्प - मुरलीधर मोहोळ
  • प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प हा १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारा तर आहेच, शिवाय विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणाराही आहे. गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी (GYAN) या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवतानात या अर्थसंकल्पाला असलेला सर्वसमावेशी आणि दूरदर्शीपणा मोदी सरकाराच्या विकासाच्या धोरणांचे प्रतीक आहे. (Union Budget 2025)

(हेही वाचा – Union Budget 2025 : विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा अर्थसंकल्प – अशोक चव्हाण)

करप्रणालीमध्ये बदल करतानाच १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे हा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे मध्यमवर्गीय घटकाला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत नेणे, हाही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा अर्थसंकल्प सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्माणाला दिशा देणारा आहे. (Union Budget 2025)

(हेही वाचा – Maharashtra Weather Update: राज्याचा पारा आणखी चढणार; अवकाळी पावसाची शक्यता)

समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यापासून तर उत्तम आरोग्य सुविधा, लघु उद्योगांचे सक्षमीकरण, विमा क्षेत्रातील गुंतवणूक आणि निर्यात धोरण या सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठीच्या योजना, एमएसएमई आणि महिला उद्योगांचे सक्षमीकरण, वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी उचललेली पावले आणि एआय प्रणालीला मिळणारे प्रोत्साहन याही महत्त्वाच्या बाबींना दिलेले स्थान मोदी सरकारची सर्वांगीन विकासाची कटिब्धता दर्शविते. सर्वसमावेशी आणि दूरदर्शी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन ! (Union Budget 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.