हिंदू देवता, संत आणि महाकुंभमेळ्याचा (Mahakumbh) अपमान केल्याबद्दल उत्तर प्रदेशातही निर्देश सिंग (Nirdesh Singh) हिला उत्तर प्रदेश पोलिसांनी यांना अटक केली.
वृत्तानुसार, त्यांना गुरुवारी, ३० जानेवारी रोजी नोएडा येथून निर्देश सिंगला (Nirdesh Singh) अटक करण्यात आली. प्रमोद सैनी यांच्या तक्रारीवरून माझोला पोलिस ठाण्यात सिंग हिच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १९६(१), २९९, ३०२, ३५३(१)(सी), ३५३(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला.
मुरादाबादचे एसपी कुमार रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना माहिती मिळाली की निर्देश सिंग (Nirdesh Singh) नोएडामध्ये राहत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. मुरादाबाद पोलिसांनी यापूर्वी निर्देश सिंग (Nirdesh Singh) हिच्या निवासस्थानी छापे टाकले होते.
सायबर सेलकडेही झालेली तक्रार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर निर्देश सिंग (Nirdesh Singh) या महिला हिंदू धर्मातील श्रद्धास्थान असलेले भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, द्रौपदी यांच्या विषयी अश्लील भाषेत पोस्ट करून त्यांचा अवमान केला आहे. तसेच सध्या महाकुंभ मेळा (Mahakumbh) सुरु आहे. त्याविषयीदेखील धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे या निर्देश सिंग (Nirdesh Singh) यांच्या विरोधात वकील अमिता सचदेव यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
Join Our WhatsApp Community