संभल (Sambhal Violence) येथील हिंसाचारादरम्यान पाकिस्तानातील (Pakistan) मौलानाशी बोलल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका २४ वर्षीय तरुणाला दि. ३० जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा : Top 10 Private Banks in India : भारतातील सगळ्यात मोठ्या १० खाजगी बँका कुठल्या आहेत?)
मोहम्मद अकिल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मिर्झापूर (Mirzapur) नारूल्लापूर गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर संभलच्या बहजोई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दि. ३१ जानेवारी रोजी कोर्टाने त्याची रवानगी तुरूंगात केली आहे.
संभलचे एएसपी श्रीश चंद्रा (Srish Chandra) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकिलने पाकिस्तानातील मौलवी मोहम्मद अली मिर्झा याच्याशी १५ जानेवारी रोजी चर्चा केली. त्याने न्यायालयाने शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी संभलमध्ये उसळलेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांना शहीद म्हटले जावे की नाही यासंदर्भात मौलवीकडे विचारणा केली.
यावेळी हिंसाचार रोखण्यात पोलिसांच्या सहभागावर देखील त्याने प्रश्न उपस्थित केले. याप्रकरणी व्हिडिओ कॉल आणि मोबाईलवर केलेल्या चॅटचा तपशील आमच्या ताब्यात आहे. यामुळे लोकांच्या भावनांना धक्का पोहचला आहे आणि देशाची बदनामी झाली आहे, असेही एएसपी चंद्रा म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community