Chhattisgarh मध्ये चकमकीत ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान

50
Chhattisgarh मध्ये चकमकीत ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान
Chhattisgarh मध्ये चकमकीत ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये दि. १ फेब्रुवारी रोजी झालेल्या चमकमकीत ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. नक्षलमुक्त छत्तीसगडसाठी (Naxal-free Chhattisgarh) प्रशासनाने कंबर कसली असून त्यादृष्टीने सुरक्षादलांनी धडक मोहिम हाती घेतली आहे.

(हेही वाचा : Sambhal Violence दरम्यान पाकिस्तानी मौलवीसोबत संभाषण करणाऱ्या आरोपीला अटक)

डीआरजी, एसटीएफ (STF), कोबरा, सीआरपीएफ (CRPF) २२२ यांची संयुक्त टीम नक्षलविरोधी अभियान (Anti-Naxal campaign) राबवित असताना गंगालूरमध्ये (Gangalur) नक्षली दबा धरून बसल्‍याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यावरून पोलिसांनी कारवाई केली असता, गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज, शनिवारी सकाळी चकमक घडली. सुरक्षादलांच्या या संयुक्त कारवाईत ८ नक्षली मारले गेले. यावेळी ठार झालेल्या नक्षल्यांकडून शस्त्रास्त्रे व अन्य सामग्री हस्तगत करण्यात आली असल्याची अधिकाऱ्यांनी दिली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.