मार्च, एप्रिल या महिन्यात Bangladeshi Infiltrators ची देशात सर्वाधिक घुसखोरी; घुसखोरांनेच दिली चौकशीत माहिती

40
मार्च, एप्रिल या महिन्यात Bangladeshi Infiltrators ची देशात सर्वाधिक घुसखोरी; घुसखोरांनेच दिली चौकशीत माहिती
  • प्रतिनिधी 

बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्याचे प्रमाण मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात सर्वाधिक होत असते अशी माहिती वर्सोवा पोलिसांनी अटक केलेल्या एका घुसखोर बांगलादेशी नागरिकाने पोलिसांच्या चौकशीत सांगितले. बांगलादेशी नागरिकाच्या म्हणण्यानुसार, ज्या मार्गाने भारतात सर्वाधिक घुसखोरी होते तो नदीचा मार्ग आहे आणि मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये नदी कोरडी पडलेली असते त्यामुळे भारतात घुसखोरी करण्यासाठी कुठलाही धोका नसतो असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाने चौकशीत उघड केले आहे. (Bangladeshi Infiltrators)

(हेही वाचा – हिंदू देवता, महाकुंभमेळा यांचा अवमान करणाऱ्या Nirdesh Singh ला पोलिसांनी केली अटक)

बुख्तियार दोसुर शेख (७०) आणि त्यांचा मुलगा मोनेर (३५) अशी वर्सोवा पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांची नावे असून हे दोघे पितापुत्र आहेत. हे दोघे १० ते १२ वर्षांपासून मुंबईतील अंधेरी वर्सोवा यारी रोड येथे राहण्यास होते. हे पितापुत्र बांगलादेशातील ढाका, खुलना विभागातील चुआडंगा जिल्ह्यातील जीवननगर, अंदुलबारिया गावात राहणारे आहेत. वर्सोवा पोलिसांनी या दोघांना नुकतीच अटक केली आहे. हे दोघे पितापुत्र मुंबई महानगरपालिकेत कंत्राट पद्धतीने मागील काही वर्षांपासून काम करीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Bangladeshi Infiltrators)

(हेही वाचा – Sambhal Violence दरम्यान पाकिस्तानी मौलवीसोबत संभाषण करणाऱ्या आरोपीला अटक)

पोलिसांना या दोघांकडे भारतीय असल्याचे कुठलेच पुरावे अथवा बोगस कागदपत्रे आढळून आलेली नाही. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. बांगलादेशात प्रवेश केल्यावर गंगेला पद्मा असे संबोधले जाते. भारत आणि बांग्लादेश यांच्यात ५४ नद्या आहेत आणि या नदीच्या सीमेवर सुरक्षा त्रुटी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बुख्तियार आणि मोनेर १० ते १२ वर्षांपूर्वी पद्मा नदी मार्गे भारतात दाखल झाले आणि त्यांनी आपल्या कुटुंबाला भारतात पैसे कमावून बांगलादेशात परतण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते बांगलादेशात परत कधीही गेले नाही, अटक आरोपींच्या चौकशीत त्यांनी सांगितले की, एप्रिल आणि मार्च या दोन महिन्यांत बांगलादेशातील पद्मा नदीचे पात्र काही भाग कोरडे पडतात आणि पाण्याची पातळी कमी होते असते. त्यामुळे या दोन महिन्यात सर्वाधिक बांगलादेशी भारतात नदी मार्गाने घुसखोरी करतात, त्याच मार्गाने हे दोघे भारतात आले आहे. भारतात आल्यानंतर हे दोघे मुंबईत आले आणि मजुरी करायला लागले, त्यानंतर, ते एका कंत्राटदाराला भेटले आणि त्याच्याकडे सफाई कर्मचारी म्हणून काम करू लागले. अनेक वर्षांपासून ते कंत्राटदाराच्या हाताखाली काम करत होते. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.