Veer Savarkar : साने गुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी सावरकर स्मारकातील लाईट अँड साउंड शो पाहून झाले प्रभावित

याप्रसंगी मुलांनी सावरकर स्मारकातील 1857 पासूनच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी सशस्त्र क्रांती केली, त्यांच्याविषयीचे भीत्ती चित्रे पाहिली.

19

दादर येथील साने गुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांनी शनिवार, १ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सर्व उपक्रमांची माहिती घेतली. वीर सावरकरांचा (Veer Savarkar) जीवनपट दर्शविणारा लाईट अँड साऊंड शो पाहून मुले अधिक प्रभावित झाली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

savarkr1

१८५७ पासूनच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी सशस्त्र क्रांती केली, त्यांच्याविषयीचे सावरकर स्मारकातील भीत्तीचित्रे याप्रसंगी मुलांनी पाहिली. तसेच तिथे असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचेही दर्शन घेतले. त्याचबरोबर स्मारकातील विविध उपक्रमांच्या विषयी माहिती जाणून घेतली. वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी अंदमानात शिक्षा भोगताना जो कोलू फिरवला, ज्यामुळे त्यांना भरपूर यातना सहन कराव्या लागल्या, त्या कोलूची प्रतिकृती पाहून मुलांना वीर सावरकर यांनी सहन केलेल्या यातनांची जाणीवही झाली.

(हेही वाचा Veer Savarkar : ऍश लेन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सावरकर स्मारकातील लाईट अँड साउंड शो पाहून झाले प्रभावित)

स्मारकात दर शनिवार आणि रविवार लाईट अँड साउंड शो होतो, त्यावेळी दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या शाळेतील मुले किंवा संस्थेचे कार्यकर्ते हा शो पाहून प्रभावित होत असतात. जानेवारी महिन्यात अभिनव भारत संस्कृती ही रांगोळी क्षेत्रात काम करणारी पुण्यामधील संस्थेच्या वतीने शाळकरी मुले, त्यानंतर इंडियन एज्युकेशन सोसायटी या प्रथितयश शैक्षणिक संस्थेच्या दादर येथील  ऍश लेन इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी स्मारकाला भेट दिली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.