-
ऋजुता लुकतुके
बीएमडब्ल्यू कंपनीने आपल्या एक्स३ एसयुव्ही गाडीच्या भारतातील लाँचसाठी मूहूर्त निवडला तो अहमदाबादमध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ऑटोएक्स्पोचा आणि त्यानुसार ही बहुचर्चित गाडी आता भारतात उपलब्ध होणार आहे. भारतात गाडीला २.० लीटर क्षमतेची पेट्रोल आणि डिझेल इंजिन असतील आणि पेट्रोल इंजिन असलेल्या गाडीची किंमत ७५.८९ लाखांपासून तर डिझेल इंजिन असलेली गाडी ७७.५० लाखांपासून सुरू होणार आहे. गाडीचं डिझाईन आणि अंतर्गत रचना पूर्णपणे बदलण्यात आली आहे. (BMW X3 2025)
बाहेरून गाडीचा लुक अगदी अत्याधुनिक वाटावा असाच आहे. गाडीची पुढून दिसणारा लुक हा किडनी ग्रिल शेप आहे. आणि हेडलाईट क्लस्टर डीआरएल दिव्याचं आहे, ज्याचा लुकही आधुनिक आहे. गाडीच्या आतील व्यवस्थाही बदलेली आहे. (BMW X3 2025)
(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये चकमकीत ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान)
Experience the 2025 #BMW X5 xDrive50e, a plug-in hybrid SUV. pic.twitter.com/ZLRKOLgHY1
— BMW of Darien (@BMWofDarien) January 30, 2025
गाडीच्या आत चालकासमोर असलेला डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट डिस्प्ले हे एकत्र करून १४.९ इंचांचा एक मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. आणि यात चालकासमोरचा डिस्प्ले १२ इंचांचा आहे. गाडीतील सर्व डिजिटल सुविधांसाठी कंपनीने बीएमडब्ल्यू ९ ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. गाडीला पॅनोरमिक ग्लास रुफ आहेच. शिवाय व्हेटिलेटेड स्पोर्ट्स सिट्स, हार्मन कार्डनची म्युझिक यंत्रणा, चालकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुरक्षा यंत्रणा असा सुविधाही गाडीत आहेत. (BMW X3 2025)
गाडीचं २.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन हे १९० हॉर्सपॉवर आणि ३१० एनएम इतकी शक्ती निर्माण करू शकतं. तर डिझेल इंजिनही १९७ हॉर्स पॉवरपर्यंत काम करतं. इंजिनातून तयार झालेली शक्ती ८ स्पीडच्या स्वयंचलित गिअरबॉक्समुळे सर्व चाकांपर्यंत पोहोचवली जाते. भारतात या गाडीचं बुकिंग आता सुरू झालं आहे आणि ६ महिन्यांत ती लोकांना मिळायलाही लागेल. या गाडीची स्पर्धा आऊडी क्यू५, रेंज रोव्हर इव्होक, व्होल्वो एक्ससी६० आणि मर्सिडिझ बेंझ जीएलसी यांच्याशी असणार आहे. (BMW X3 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community