TVS Ronin : टीव्हीएस रॉनिनचं भारतात आगमन, किंमत १.४९ लाखांपासून सुरू

TVS Ronin : भारत मॉबिलिटी एक्स्पोमध्ये रॉनिन जगासमोर आली.

38
TVS Ronin : टीव्हीएस रॉनिनचं भारतात आगमन, किंमत १.४९ लाखांपासून सुरू
  • ऋजुता लुकतुके

टीव्हीस कंपनी ही देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. अलीकडेच कंपनीने आपली महत्त्वाकांक्षी बाईक टीव्हीएस रॉनिन बाजारात आणली आहे. त्यासाठी कंपनीने मूहूर्त पकडला तो अहमदाबादमध्ये झालेल्या भारत मॉबिलिटी एक्स्पोचा. २२५ सीसी क्षमतेची ही बाईक सिमेंटचं जंगल आणि खरंखुरं जंगल पादाक्रांत करायला तयार आहे असाच कंपनीचा दावा आहे. म्हणजेच शहरात आणि जंगली ओबध धोबड वस्तीतही बाईकची कामगिरी चांगली असेल असंच कंपनीला सुचवायचं आहे. (TVS Ronin)

टीव्हीएस कंपनीची ही पहिली स्क्रँबलर बाईक आहे आणि या बाईकसह ते लाईफस्टाईल बाईकच्या क्षेत्रात उतरले आहेत. अशा बाईकला साजेशा ॲक्सेसरीजही कंपनीने बाजारात आणल्या आहेत. रॉनिन बाईक तीन प्रकारांत ग्राहकांना उपलब्ध होईल. सिंगल टोन-सिंगल चॅनल एबीएस, ड्युआल टोन-सिंगल चॅनल एबीएस आणि ट्रिपल टोन-ड्युआल चॅनल एबीएस अशा या तीन श्रेणी असतील. आणि किंमत १.४९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. (TVS Ronin)

(हेही वाचा – BMW X3 2025 : बीएमडब्ल्यू एक्स३ गाडीची भारतातील किंमत ७८ लाखांपासून पुढे)

आधी सांगितल्या प्रमाणे बाईकचं इंजिन २२५ सीसी क्षमतेचं आहे आणि यातून २०.१ बीएचपी आणि १९.९३ एनएम इतकी शक्ती निर्माण होऊ शकते. गाडीचा वेग १२० किमींवर नियंत्रित करण्यात आला आहे. तर बाईकचा डॅशबोर्डला कारशी तुलना करता येईल इतका अद्ययावत आहे. यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलही करू शकता. (TVS Ronin)

गाडीचे दिवे हे आधुनिक एलईडी प्रकारचे आहेत आणि पुढील दिवा हा गोल आकाराचा आणि मध्ये टी हे अक्षर असलेला आहे. तुमच्या समोरील डॅशबोर्ड हा आवाजाने दिलेल्या सूचना पाळू शकेल. तर युएसबी चार्जिंगची सोयही या बाईकमध्ये आहे. सध्या या बाईकला बाजारात फारशी स्पर्धा नाही. येझदी स्क्रँबलर (२.०७ लाख रु), जावा ४२ (१.६९ लाख) आणि रॉयल एनफिल्ड हंटर ३५० या बाईकशी स्पर्धा असली तरी किमतीच्या बाबतीत टीव्हीएस कंपनीने या तिघांवरही आघाडी घेतली आहे. (TVS Ronin)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.