-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच आता महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी मोठ्या विकासकामांच्या प्रस्तावांच्या मंजुरीच लाल फितीत बांधून ठेवले आहे. महापालिकेच्यावतीने आता नव्याने निविदा काढण्यास तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे, शिवाय यापूर्वी ज्या कामांच्या निविदा झाल्या आहेत, त्यातील कामांच्या मंजुरीचे प्रस्तावच आयुक्तांनी रोखून धरण्याचे कडक धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे. (BMC)
(हेही वाचा – ‘हिंदुत्त्वाचे राजकारण करणे ही आमची चूक’ म्हणाऱ्यांना जनता अद्याप विसरलेली नाही; Eknath Shinde यांचा ठाकरेंवर हल्लाबोल)
मुंबई महापालिकेच्यावतीने निवडणूक आचारसंहितेपूर्वी विविध खात्यांच्या माध्यमातून विकासकामांच्या निविदा मागवण्यात आल्या. या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लघुत्तम कंत्राटदाराची निवड केल्यानंतर आयुक्तांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते. आयुक्तांची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर स्थायी समिती प्रशासक म्हणून पुन्हा आयुक्तांकडे मंजुरीला पाठवण्यात आले होते. परंतु विधानसभा आचारंसहिता असल्याने काही प्रस्तावांवर आयुक्तांनी कोणताही निर्णय न घेता ते प्रस्ताव राखून ठेवले होते. तर काही प्रस्तावांची प्रशासकीय मान्यताही राखून ठेवली होती. आचारसंहिता असल्याने या विकासकामांच्या प्रस्तावांची चर्चा झाली नसली तरी प्रत्यक्षात विधानसभा आचारसंहिता उठल्यानंतरही आयुक्त तथा प्रशासकांनी आपली भूमिका कायम राखत अनेक प्रस्ताव आजही आपल्याकडेच कायम ठेवले. (BMC)
(हेही वाचा – Railway Budget साठी २.५५ लाख कोटींची तरतूद; अपघात कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न)
महापालिका प्रशासकांनी, पूर्वी आचारसंहितेमुळे विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली नसली तरी आचारसंहिता उठल्यानंतरही आयुक्तांनी प्रस्तावांना मंजुरी न देण्याचा निर्धार केल्याने अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकांकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या प्रस्तावांपैकी देखभाल आणि दुरुस्तीसह ज्या कामांचा थेट जनतेच्या जीवनमानावर परिणाम होईल, असे प्रस्ताव मंजूर करण्यास प्राधान्य दिले आहेत, ज्या विकासकामांची आता तेवढीसी गरज नाही तेच प्रस्ताव त्यांच्याकडून राखून ठेवले जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता आयुक्तांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही मोठ्या विकासकामांच्या निविदा काढण्यासही आयुक्तांनी स्थगिती दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नालेसफाईसह इतर दैनंदिन कामांच्या निविदाच निमंत्रित केल्या जात आहेत, मात्र, अन्य कोणत्याही नवीन कामांच्या निविदा न काढण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असल्याचेही बोलले जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community