अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला दिलासा; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे विधान

34
अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला दिलासा; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे विधान

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर राज्यभरात त्याची चर्चा रंगली असून, या बजेटमध्ये मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा देण्यात आल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी नमूद केले.

(हेही वाचा – ‘हिंदुत्त्वाचे राजकारण करणे ही आमची चूक’ म्हणाऱ्यांना जनता अद्याप विसरलेली नाही; Eknath Shinde यांचा ठाकरेंवर हल्लाबोल)

“या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याने सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे मध्यमवर्गीयांना आर्थिक सुट मिळणार असून, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना याचा लाभ होईल. कॅन्सरसह अन्य दुर्धर आजारांवरील औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परदेशातून आयात होणाऱ्या औषधांबरोबरच देशांतर्गत उत्पादनांवरही सवलती देण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध होतील. (Dr. Neelam Gorhe)

(हेही वाचा – Union Budget 2025 : सर्वसमावेशी आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करणारा अर्थसंकल्प – मुरलीधर मोहोळ)

महिला बचत गटांसाठी सुरू असलेल्या ‘लखपती दीदी’ सारख्या योजनांना अर्थसंकल्पात पाठिंबा मिळाल्याचे डॉ. गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी नमूद केले. तसेच, महाराष्ट्रात शहरांचा चेहरा बदलत असून, दळणवळण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. मुंबईतील अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग यांसारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी शहरांचा विकास वेगाने होत असल्याचे सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.