७७ देशाच्या ११८ राजदूतांनी केले महाकुंभात स्नान; Yogi Adityanath म्हणाले, सनातन मानव धर्म

70
७७ देशाच्या ११८ राजदूतांनी केले महाकुंभात स्नान; Yogi Adityanath म्हणाले, सनातन मानव धर्म
७७ देशाच्या ११८ राजदूतांनी केले महाकुंभात स्नान; Yogi Adityanath म्हणाले, सनातन मानव धर्म

मौनी अमावस्येला दि. २९ जानेवारी रोजी प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभात झालेल्या अपघातानंतर आता परिस्थिती पुर्णपणे बदलली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दि. १ फेब्रुवारी रोजी महाकुंभ मेळ्याच्या परिसरात पोहचून तयारी पाहणी केली. दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) आणि ७७ देशांतील ११८ राजदूतांनी १ फेब्रुवारी रोजी संगम घाटावर स्नान केले.

( हेही वाचा : Union Budget मध्ये महाराष्ट्रासाठी काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

प्रयागराजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उपराष्ट्रपतींसह संगममध्ये स्नान केले. यासोबतच ते संतांनाही भेटले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले की, कट रचणारे कधीही यशस्वी होणार नाहीत. काही लोक सतत दिशाभूल करत असतात. ते म्हणाले, “चेंगरीच्या दिवशी संतांनी संयम गमावला नाही. सनातन हा मानव धर्म आहे. जर सनातन राहिले तर मानवही राहतील. सनातन (Sanātana) धर्माला कोणीही धक्का लावू शकत नाही.

संतांना भेटताना मुख्यमंत्री योगी (Yogi Adityanath) म्हणाले, “काही पुण्यात्मे अपघाताचे बळी ठरले. त्यावेळी तुम्ही संतांनी प्रशासनाच्या आवाहनाला संयमाने साथ दिली आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. काही लोक सनातनच्या विरोधात असून त्यांनी संतांच्या संयमाचा अंत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी डोक्यावर शिवलिंग ठेवून संगमात स्नान केले. यानंतर, त्यांनी लेथ हनुमान मंदिरात पूजा केली. तसेच सरस्वती विहिर आणि अक्षयवटचे दर्शन घेतले. उपराष्ट्रपतींनी कुंभमेळ्यालाही भेट दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभात स्नान करणार आहेत.

त्याचवेळी, अमेरिका (America) , ब्राझील, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, रशिया (Russia), स्वित्झर्लंड, जपान, न्यूझीलंड, जर्मनी, नेपाळ, कॅनडा यासह ७७ देशांतील ११८ राजदूतांनी प्रयागराज (Prayagraj) महाकुंभात स्नान केले. यापूर्वी, २०१९ च्या कुंभमेळ्यातही ७३ देशांच्या राजदूतांना आमंत्रित करण्यात आले होते. या राजदूतांनी प्रयागराज महाकुंभ आणि तिथल्या व्यस्थापनाचे मनापासून कौतुक केले आहे. (Yogi Adityanath)

महाकुंभाला येणारे भाविक स्वच्छतेचीही काळजी घेत आहेत. १३ ते ३१ जानेवारी या कालावधीत ३१.५० कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. ही संख्या दिल्लीच्या लोकसंख्येपेक्षा जवळजवळ नऊ पट जास्त आहे. दरम्यान एवढी मोठी लोकसंख्या असूनही, १९ दिवसांत महाकुंभ मेळ्याच्या परिसरात केवळ ६,००० मेट्रिक टन कचरा निर्माण झाला. येथे दररोज सरासरी ३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो आणि विशेष सणांच्या दिवशी ४०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो.(Yogi Adityanath)

महाकुंभच्या परिसरात गोळा होणारा कचरा घुरपूर येथील प्लांटमध्ये पाठवला जात आहे. प्लांटमधील कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केल्यानंतर, आरडीएफ सिमेंट कारखान्यात पाठवला जात आहे. सुमारे ३.४६ कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत दररोज ११,००० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचरा उत्सर्जित करण्यात लखनौ पहिल्या क्रमांकावर आहे आणि कानपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशावेळी महाकुंभमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जातेय. (Yogi Adityanath)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.