Union Budget 2025 : केंद्राचे मुंबई मेट्रोला पाठबळ; अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी मोठी तरतूद

48
Union Budget 2025 : केंद्राचे मुंबई मेट्रोला पाठबळ; अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी मोठी तरतूद
Union Budget 2025 : केंद्राचे मुंबई मेट्रोला पाठबळ; अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी मोठी तरतूद

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो प्रकल्पांची १४ कामे सुरू असून, या प्रकल्पांचा खर्च जवळपास दीड लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी १,२५५.०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे मेट्रो प्रकल्पांना आर्थिक रसद नक्कीच मिळणार आहे. (Union Budget 2025)

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe : ऐतिहासिक शिवकालीन वाघनखं नागपूरकडे रवाना ; सातारा मुक्काम संपला)

एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुलातील त्यांच्या मालकीच्या जमिनी विकून-भाडेतत्त्वावर देऊन मेट्रो प्रकल्पांच्या खर्चासाठी निधी उभारला आहे. मात्र आता फारसे भूखंड शिल्लक नसल्याने एमएमआरडीएला उत्पन्नाचे अन्य स्रोत शोधावे लागत आहे. अशा स्थितीत केंद्राने केलेली हा मदत नक्कीच मोठी आहे.

एमएमआरडीएच्या एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधेसाठी ७९२.३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून देशभर ग्रोथ हब उभारले जाणार आहेत. महाराष्ट्रात एमएमआरडीएच्या माध्यमातून ग्रोथ हबची उभारणी होणार आहे. त्यासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो. गेल्या दोन वर्षांत मुंबईत दोन मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. हे दोन्ही मार्ग पश्चिम उपनगरातील भाग जोडणारे आहेत. त्यानंतर अलीकडेच मेट्रो -३ चा पहिला टप्पाही वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

या सर्व प्रकल्पांसाठी सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्च आहे. या खर्चातील काही वाटा केंद्र आणि राज्य सरकारने उचलला आहे. मध्यंतरी राज्य सरकारच्या सांगण्यावरून मुंबई महापालिकेने एमएमआरडीएला काही निधी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.