गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आक्रमकपणे घेतले. यामध्ये कॅनडा आणि मेक्सिकोवर (Mexico) अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचाही समावेश आहे. आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून कॅनडा आणि मेक्सिकोनेही (Mexico) अमेरिकेवर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर टॅरिफ (tariffs) युद्ध सुरु झाले आहे.
( हेही वाचा : Union Budget 2025 : केंद्राचे मुंबई मेट्रोला पाठबळ; अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी मोठी तरतूद)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बेकायदेशीर स्थलांतर आणि अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित चिंता व्यक्त करत दि. १ फेब्रुवारी रोजी कॅनडा आणि मेक्सिकोमधून (Mexico) होणाऱ्या आयातीवर २५ टक्के शुल्काची घोषणा केली होती. यानंतर आता कॅनडानेही १५५ अब्ज कॅनडायन डॉलर्स किमतीच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के शुल्क लादेल, असे कॅनडाचे (Canada) हंगामी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले आहे. दरम्यान मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम (Claudia Sheinbaum) यांनीही त्यांच्या अर्थमंत्र्यांना मेक्सिकन निर्यातीवर अमेरिकेने लादलेल्या मोठ्या शुल्काविरुद्ध नवीन टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ धोरणे लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकेत वाढणार महागाई
अमेरिका कॅनडा (Canada) आणि मेक्सिकोमधून तेल मोठ्या प्रमाणात आयात करते. अतिरिक्त आयात शुल्क लागू झाल्यानंतर अमेरिकेत पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकते. त्याचवेळी चीनमधून आयात होणारी इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि इतर ग्राहकोपयोगी वस्तू महाग होतील.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community